BSNL कडून 251 रुपयांत 70GB डेटा; जाणून घ्या जियो, एयरटेल आणि Vi चे प्लॅन्स

BSNL कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी नुकताच 251 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन लाँच केला आहे. कंपनी या प्लॅनमध्ये 70 जीबी डेटा देत आहे.

BSNL कडून 251 रुपयांत 70GB डेटा; जाणून घ्या जियो, एयरटेल आणि Vi चे प्लॅन्स
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 6:28 PM

मुंबई : BSNL कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी नुकताच 251 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन लाँच केला आहे. कंपनी या प्लॅनमध्ये 70 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनची वैधता केवळ 28 दिवसांची आहे. ज्या ग्राहकांनी अगोदरच प्रीपेड प्लॅन घेतला आहे त्यांना ही वैधतेची अट लागू नाही. कंपनीने या प्लॅनसोबत अजून एक 151 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच कंपनीने सर्वात स्वस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर केला आहे. 10 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा दिला जात असून या प्लॅनसाठी ग्राहकांना केवळ 56 रुपये मोजावे लागणार आहेत. (BSNL giving 70GB data for Rs 251: Here’s what Jio Airtel and Vi are offering)

बीएसएनएलप्रमाणे जियो कंपनीनेदेखील चांगले प्लॅन देऊ केले आहेत. जियोने 151 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, ज्यामध्ये 30 जीबी डेटा दिला जात आहे. जियोच्या 201 रुपयांच्या प्लॅनमध्ये 40 जीबी डेटा दिला जात आहे. जर कोणत्याही ग्राहकाला अधिक डेटा हवा असल्यास, अशा युजर्ससाठी कंपनीने 251 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये युजर्सना 50 जीबी डेटा मिळणार आहे. या सर्व प्लॅन्सची वैधता 30 दिवस आहे.

एअरटेलचा प्रीपेड डेटा प्लान 251 रुपयांचा असून यामध्ये तुम्हाला 50 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनला कोणत्याही प्रकारची वैधता नाही. कंपनीने 401 रुपयांचा रिचार्ज देऊ केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 30 जीबी डेटा दिला जातोय, सोबतच डिज्ने+ हॉटस्टारचं एक वर्षांचं सब्सक्रिप्शनही दिलं जात आहे. या प्लॅनची वैधता मात्र 28 दिवसांची आहे.

Vi कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यात काही प्रमाणात मागे पडल्याचे गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. Vi कंपनीने 251 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 50 जीबी डेटा दिला जातोय. कंपनीने 351 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. यामध्ये युजर्सना 100 जीबी डेटा दिला जात आहे. या पॅकची वैधता 56 दिवसांची आहे. या प्लॅनसमध्ये युजर्सना वी मुव्ही आणि टीव्ही अॅप्स दिले जात आहेत. वी कंपनी 16 रुपयांमध्ये 3 जीबी डेटा असलेला पॅक देते, तर एअरटेल कंपनी याच पॅकसाठी 48 रुपये चार्ज करते.

84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा हवाय?

एअरटेल (Airtel)

एअरटेल कंपनी 698 रुपयांमध्ये 84 दिवसांचा प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. तसेच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. सोबतच तुम्हाला एयरटेल एक्सट्रिम प्रीमियम, मोफत हॅलो ट्युन्स, विन्क म्युझिक आणि 150 रुपयांचा फास्टॅग कॅश मिळेल.

बीएसएनएल (BSNL)

बीएसएनएल कंपनी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. यामध्ये तुम्हाला दररोज 250 मिनिटं FUP लिमिट आहे. या प्रीपेड प्लॅनद्वारे तुम्ही मोफत कॉलर ट्युनही सेट करु शकता.

रिलायन्स जियो (Reliance Jio)

जियो कंपनी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 84 दिवसांसाठी 2 जीबी डेटा दिला जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नेट कॉलिंग आणि जियो टू नॉन जियो कॉलिंगदेखील मिळेल. याची FUP लिमिट 3000 मिनिटं इतकी आहे. तसेच यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. सोबतच सर्व प्रकारचे जियो अॅप्स मोफत वापरता येतील.

Vi वोडाफोन आयडिया (VI : Vodafone Idea)

Vi कंपनी 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 4 जीबी डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्सची सुविधा मिळेल. सोबतच दररोज 100 लोकल आणि नॅशनल एसएमएस पाठवता येतील.

प्रीपेड प्लॅन्सचा विचार करत असाल तर रिलायन्स जियो आणि बीएसएनलचा प्लॅन सर्वोत्तम आहे. दोन्ही कंपन्या 599 रुपयांमध्ये 84 दिवस डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहेत. याच प्लॅनसाठी एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्या 100 रुपये अधिक घेत आहेत.

संबंधित बातम्या

Airtel चा Jio ला धोबीपछाड, नव्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

‘जिओ’चा नवा प्लॅन; देशातील ‘हा’ ग्राहकवर्ग काबीज करण्याची अंबानींची रणनीती

525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर

(BSNL giving 70GB data for Rs 251: Here’s what Jio Airtel and Vi are offering)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.