Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio-Airtel ला झटका, स्वस्त BSNL प्लॅनमध्ये 160 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL vs Airtel vs Jio: देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने 997 रुपयांचा एक प्लॅन आणला आहे. हा प्लॅन बीएसएनएलसाठी ‘हुकुम का इक्के’ ठरला आहे. एअरटेल आणि जिओकडे असा कोणताही प्लॅन नाही.

Jio-Airtel ला झटका, स्वस्त BSNL प्लॅनमध्ये 160 दिवसांची व्हॅलिडिटी
Follow us
| Updated on: Feb 15, 2025 | 2:21 PM

BSNL vs Airtel vs Jio: जिओ-एअरटेल या देशातील मोठ्या दूरसंचार कंपन्यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात सर्व प्लॅनचे दर वाढवले. त्यांची ही खेळी अंगलट आली आहे. बीएसएनएलला याचा फायदा झाला आहे. तब्बल 17 वर्षांनी सरकारी टेलीकॉम कंपनी नफ्यात आली आहे. त्यात सर्वात मोठे कारण बीएसएनएलचे स्वस्त प्लॅन आहे. बीएसएनएलचे अनेक प्लॅन जिओ आणि एअरटेलपेक्षा स्वस्त आहेत. त्यामुळे अनेकांनी या कंपन्यांऐवजी बीएसएनएलची वाट धरली आहे.

BSNL 997 Plan: काय आहेत फायदे

देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने 997 रुपयांचा एक प्लॅन आणला आहे. हा प्लॅन बीएसएनएलसाठी ‘हुकुम का इक्के’ ठरला आहे. एअरटेल आणि जिओकडे असा कोणताही प्लॅन नाही. 997 रुपयांच्या या प्लॅनमध्ये रोज दोन जेबी हायस्पीड डेटा मिळतो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा यामध्ये मिळते. डेटाचे लिमिट पूर्ण झाल्यावर इंटरनेट बंद होत नाही. त्यानंतर 40kbps वेगाने स्पीड मिळत असते.

बीएसएनएलच्या 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॅलिडीटी मोठी आहे. टेलिकॉम कंपनी आपल्या प्रीपेड यूजर्सला 160 दिवसांची व्हॅलिडीटी देत आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलींग आणि एसएमएस या सुविधांसह इतर काही एक्स्ट्रा बेनिफिट्स दिले नाहीत.

हे सुद्धा वाचा

Jio 999 प्लॅन आहे कसा?

रिलायन्स जिओचा 999 रुपयांचा प्लॅन बीएसएनएलचा 997 रुपयांच्या प्लॅनपेक्षा दोन रुपयांनी महाग आहे. परंतु हा प्लॅन बीएसएनएलपेक्षा खूप महाग आहे. यामध्ये रोज 2 जीबी हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा आहे. परंतु या प्लॅनची व्हॅलिडीटी 160 दिवसांची नाही तर 98 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत जिओ क्लाउड, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री एक्सेस मिळत आहे.

Airtel 979 प्लॅन

एअरटेलचा 997 रुपयांचा प्लॅन नाही, पण 979 रुपयांचा प्लॅन BSNL प्लॅनपेक्षा 18 रुपये स्वस्त आहे. हा प्लॅन BSNL ला टक्कर देतो का? ते पाहू या. या प्लॅनमध्ये प्रीपेड युजरला दररोज 2 जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. परंतु त्याची व्हॅलिडीटी बीएसएनएलपेक्षाही कमी आहे. या प्लॅनला केवळ 84 दिवसांची व्हॅलिडीटी आहे. या प्लॅनमध्ये अपोलोचे तीन महिन्याचे सदस्यत्व, अनलिमिटेड 5जी डेटा आणि 22 पेक्षा जास्त ओटीटीचा फायदा मिळतो. सर्व प्लॅनची तुलना केल्यावर बीएसएनएल सरस ठरत आहे.

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.