Samsung Galaxy S21+ वर 10000 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?
सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे, या ऑफरअंतर्गत Samsung Galaxy S21+ खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 10,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल.
मुंबई : सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे, या ऑफरअंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी एस 21+ (Samsung Galaxy S21+) खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्व ग्राहकांना 10,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. यामध्ये ग्राहकांना 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 71,999 रुपये आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 75,999 रुपये मोजावे लागतील. (Bumper Offer : Rs 10000 instant cashback on Samsung Galaxy S21 Plus)
याव्यतिरिक्त, गॅलेक्सी बड्स प्रोसह गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा, गॅलेक्सी एस 21+ आणि गॅलेक्सी एस 21 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 990 रुपये किंवा 10,000 रुपये किंमतीचे सॅमसंग शॉप व्हाउचर मिळेल. या व्यतिरिक्त, कंपनीने गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस 21 साठी 10,000 रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस देखील सुरू केला आहे. हे दोन्ही डिव्हाईस एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डेद्वारे ईएमआय पर्यायांसह अनुक्रमे 10,000 आणि 5,000 रुपयांच्या बँक कॅशबॅक ऑफर्ससह उपलब्ध असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
सॅमसंगने सॅमसंग गॅलेक्सी एस 21 सीरिज डिव्हाइसच्या खरेदीवर ऑफर्स सादर केल्या आहेत. गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा, गॅलेक्सी एस 21 + किंवा गॅलेक्सी एस 21 खरेदी करणार्या ग्राहकांना केवळी 990 रुपयांत 15,990 रुपये किंमतीचे गॅलेक्सी बड्स प्रो खरेदी करता येतील किंवा 10,000 रुपयांचे सॅमसंग शॉप व्हाउचर मिळतील, तथापि, ग्राहकांना गॅलेक्सी एस 21 सिरीज फोन खरेदीनंतर गॅलेक्सी बड्स प्रोवर दावा करावा लागेल. फोन विकत घेतल्यानंतर, त्यांना सॅमसंग शॉप आणि क्लेम व्हाउचरवर नोंदणी करावी लागेल. याद्वारे ग्राहक अवघ्या 990 रुपयांमध्ये बड्स प्रो खरेदी करु शकतील.
कशी आहे Samsung Galaxy S21 सिरीज?
सॅमसंग Galaxy S21 सिरीजमध्ये Exynos 2100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, यामधील 5G इंटिग्रेटेड मोबाईल प्रोसेसर दुसऱ्या प्रोसेसर्सच्या तुलनेत सर्वात फास्ट आहे. हे तिन्ही फोन 5 जी टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. Galaxy S21 तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर Galaxy S21+ चार कलर वेरियंटसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अंड्रॉयड 11 वर बेस्ड आहेत. तसेच हे फोन One UI 3.1 वर काम करतील. यामध्ये डुअल सिम (नॅनो) सपोर्ट देण्यात आला आहे.
गॅलेक्सी एस 21 मध्ये 6.2 इंचांचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी 421ppi इतकी आहे. याचा पॅनल फ्रंट कॅमेरासाठी एक पंच-होलचं काम करतो. गॅलेक्सी S21+ थोडा मोठा आहे. याचा डिस्प्ले 6.7 इंचांचा आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 394ppi इतकी आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रा हा स्मार्टफोन S21 आणि S21+ या दोन्ही फोन्सपेक्षा मोठा आहे. या फोनच्या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 515ppi इतकी असून डिस्प्ले 6.8 इंचांचा आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राचा डिस्प्ले गॅलेक्सी नोट सिरीजच्या एस पेनला सपोर्ट करतो.
शानदार कॅमेरा आणि बॅटरी
या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास S21 आणि S21+ ममध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64-मेगापिक्सलचा आहे, सेकेंडरी कॅमरा 12-मेगापिक्सल आणि वाईड-अँगल लेन्स 12-मेगापिक्सलची आहे. यामध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सेकेंडरी कॅमरा 12 मेगापिक्सलचा आणि दोन लेन्स 10-10 मेगापिक्सलच्या देण्यात आल्या आहेत. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
गॅलेक्सी S21 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी S21+ मध्ये 4800mAh ची तर S21 Ultra मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तिन्ही फोन 25W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.
इतर बातम्या
Realme कंपनी 20 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या स्वस्त फोन कधी उपलब्ध होणार
64MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह Infinix चे नवे स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजारांहून कमी
Vivo Y73 2021 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या मिड-रेंज स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स
(Bumper Offer : Rs 10000 instant cashback on Samsung Galaxy S21 Plus)