iPhone 12 पेक्षा कमी किंमतीत iPhone 13 खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Apple iPhone 13 दोन महिन्यांपूर्वी लॉन्च झाला होता. Apple iPhone 13 भारतात 79,900 रुपये इतक्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. या फोनवर आता एक शानदार डील उपलब्ध आहे.
मुंबई : Apple iPhone 13 दोन महिन्यांपूर्वी लॉन्च झाला होता. Apple iPhone 13 भारतात 79,900 रुपये इतक्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. या फोनवर आता एक शानदार डील उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन केवळ 55,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. (Buy apple iPhone 13 in less price than iphone 12 by India iStore)
या किंमतीत तुम्ही आयफोन 13 चं 128GB व्हेरिएंट खरेदी करू शकता. Apple ने सप्टेंबरमध्ये iPhone 13 सिरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते.
तुम्ही बंपर डिस्काउंटसह IndiaiStore.com वरून iPhone 13 सिरीज खरेदी करू शकता. IndiaiStore.com ही Apple डिस्ट्रीब्यूटरची अधिकृत वेबसाइट आहे. ही ऑफर क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असणे आवश्यक आहे.
तुम्ही HDFC बँकेच्या कार्डद्वारे iPhone 13 खरेदी केल्यास तुम्हाला 6,000 रुपयांची सूट दिली जाईल. ही ऑफर EMI पर्यायासह देखील वैध आहे. यासह, या फोनची किंमत 73,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय, जर तुमच्याकडे जुना आयफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळेल.
India iStore नुसार, जर तुम्ही iPhone XR 64 GB एक्सचेंज केला तर तुम्हाला 18,000 रुपयांची सूट दिली जाईल. याचा अर्थ तुम्ही आयफोन 11 किंवा त्यावरील मॉडेल एक्सचेंज केल्यास तुम्हाला अधिक एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल.
याशिवाय, तुम्हाला 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. यासह, iPhone 13 ची किंमत सुमारे 55,990 रुपये इतकी कमी होईल. तथापि, एक्सचेंज ऑफर केवळ अॅपल अधिकृत ट्रेड इन प्रोव्हायडर्स- Cashify आणि Servify साठी उपलब्ध आहे. या सिरीजमधील उर्वरित मॉडेल्सवरही तुम्हाला अशीच सूट दिली जात आहे.
iPhone 13 सिरीजचे स्पेसिफिकेशन्स
नवीन आयफोन मागील मॉडेल आयफोन 12 पासून इन्स्पायर्ड आहे. यात नवीन A15 बायोनिक चिप, रिडिजाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 13 सिरीज एक वाईड नॉच, IP68 रेटिंग, मेटल-ग्लास बॉडी आणि फेस आयडी बायोमेट्रिक सिस्टम सह येतो.
मिनी व्हेरियंटमध्ये 5.4-इंच फुल एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) ओएलईडी स्क्रीन आहे, तर आयफोन 13 आणि 13 प्रो मध्ये 6.1-इंच फुल एचडी+ (1170 × 2532 पिक्सल) ओएलईडी डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 120Hz, 6.7-इंच फुल-एचडी+ (1284 × 2778 पिक्सेल) OLED पॅनल आहे.
आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आहे आणि रियर कॅमेरा 12 एमपीच्या अल्ट्रा-वाइड लेन्ससह आहे. दोन्ही प्रो मॉडेल मागील बाजूस ट्रिपल कॅमेरासह येतात.
इतर बातम्या
48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Buy apple iPhone 13 in less price than iphone 12 by India iStore)