1.5 लाखांचा फोन 40 हजारात खरेदीची संधी, ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये दमदार कॅमेरा, अधिक स्टोरेज आणि उत्कृष्ट फीचर्स असलेले स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करता येतात.

1.5 लाखांचा फोन 40 हजारात खरेदीची संधी, 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 9:56 PM

मुंबई : देशभरात सातत्याने नवनवे स्मार्टफोन लाँच होत असतात. यापैकी बर्‍याच स्मार्टफोन्सची किंमत इतकी असते की बहुतांश लोक असे स्मार्टफोन खरेदीचा विचारसुद्धा करत नाहीत. परंतु Amazon आणि Flipkart सारख्या ई – कॉमर्स साइट्स आपल्याला निराश करत नाहीत. या साईट्स तुम्हाला वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर तगड्या ऑफर्स सादर करतात.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये दमदार कॅमेरा, अधिक स्टोरेज आणि उत्कृष्ट फीचर्स असलेले स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करता येतात. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोन्सवरील अशा ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये 1.5 लाखांचा स्मार्टफोन 40 हजीर रुपयात खरेदी करता येईल. (Buy MOTOROLA Razr Smartphone in just 40000 rs worth 1.5 lakh)

Micromax IN Note 1

Micromax IN Note 1 हा एक बजेट सेगमेंट शानदार स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 11,550 रुपयांमध्ये ऑर्डर करु शकता.

MOTOROLA Razr

मोटोरोलाने (Motorola) गेल्या वर्षी त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेझर (Moto Razr) लॉन्च केला होता. सुरवातीला, कंपनीने या फोनची किंमत खूपच जास्त ठेवली होती, त्यामुळे बरेच लोक हा फोन आवडलेला असूनही केवळ किंमतीमुळे खरेदी करु शकले नाहीत. कंपनीने हा स्मार्टफोन 1,49,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच केला होता. परंतु आता हा स्मार्टफोन तुम्ही Flipkart च्या Flagship Fest Sale अंतर्गत 95,000 रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन तुम्ही 54,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. सोबत कंपनीने या फोनवर 15,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील देऊ केली आहे. तामुळे तुम्ही हा स्मार्टफोन आता 40 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करु शकता.

मोटोरोलाच्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 21: 9 च्या अॅस्पेक्ट रेशोसह 6.2 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले मिळेल. याशिवाय यात क्विक व्ह्यू एक्सटर्नल डिस्प्लेही देण्यात आला आहे. या दोन्ही डिस्प्लेमध्ये प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. मोटो रेझरमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 616 जीपीयू आहे देण्यात आला आहे. याच्या स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

New Apple iphone 11

New Apple iphone 11 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा LCD IPS HD डिस्प्ले देण्यात आला आहे. iPhone 11 हा ब्लॅक (काळा), व्हाईट (पांढरा), लॅवेंडर, रेड (लाल), ग्रीन (हिरवा) आणि येलो (पिवळा) इत्यादी कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर आहे. iPhone 11 फास्ट फेस आईडीला सपोर्ट करतो. iPhone XR च्या तुलनेत iPhone 11 ची बॅटरी एक तास जास्त चालेल, असा दावा Apple ने केला आहे. हा फोन 30 मिनटांपर्यंत 2 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे. iPhone 11 च्या फ्रंटमध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर याच्या बॅकमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅकमध्ये 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमरे देण्यात आले आहेत. Amazon वरुन तुम्ही हा स्मार्टफोन 54,900 रुपये या स्पेशल प्राईसमध्ये ऑर्डर करु शकता.

Realme 8 5G

रियलमी कंपनीने (Realme) आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. रियलमी 8 (Realme 8) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता तुम्ही हा सर्वात स्वस्त 5G फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो आणि यात डायनॅमिक रॅम एक्सपेंशन (डीआरई) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. Realme चा हा फोन 90Hz डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा तसेच एक होल-पंच डिस्प्ले आहे.

हा फोन सायबर सिल्व्हर आणि सायबर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. ड्युअल-सिम (नॅनो) Realme 8 5G Android 11 वर Realme UI 2.0 वर चालतो आणि त्यात 90Hz रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1,080 × 2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये डीआरई तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंगसाठी बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतो. हा फोन ग्राहक 18,148 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

स्मार्टफोनमध्ये एफ / 1.8 लेन्ससह 48 मेगापिक्सेल सॅमसंग GM1 प्रायमरी सेन्सर, एफ / 2.4 पोर्ट्रेट लेन्ससह 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एफ / 2.4 मॅक्रो लेन्ससह 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रियर कॅमेरा सेटअपला नाईटस्केप, 48M मोड, प्रो मोड, AI स्कॅन आणि सुपर मॅक्रोसारखे फीचर्स जोडलेले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी या Realme 8 5G फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये f / 2.1 लेन्सचा वापर करण्यात आला आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट, नाइटस्केप आणि टाइमलॅप्स फीचर देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

तब्बल 7 इंचांचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, दमदार कॅमेरा आणि खूपच कमी, मेड इन इंडिया फोनची सर्वत्र चर्चा

22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

(Buy MOTOROLA Razr Smartphone in just 40000 rs worth 1.5 lakh)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.