कार लोन घ्यायचंय का? आधी पगारानुसार EMI किती असावा जाणून घ्या
अनेक जण कर्ज घेऊन कार खरेदी करतात पण नंतर ते गाडीचा EMI भरू शकत नाहीत. कारण, त्यांचा महिन्याच्या पगारातील अर्धा किंवा त्याहून अधिक हिस्सा EMI भरण्यात जातो. कार लोन घेण्यापूर्वी तुमचा मासिक पगार किती असावा, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

स्वत:ची कार विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण स्वत:ची कार विकत घेणं ही सामान्य माणसासाठी सोपी गोष्ट नसते. अनेक जण बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदी करतात आणि दरमहा EMI च्या माध्यमातून कारची रक्कम फेडतात. यामध्ये तुम्ही कारच्या किंमतीत जास्त पैसे मोजता. कार लोन घेणं अनेकांना योग्य वाटत नाही. जर तुम्हीही बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी तुम्ही तुमचे मासिक उत्पन्न किंवा पगार पाहावा. याविषयी पुढे जाणून घ्या.
बँकेकडून कार लोन घेतल्यास तुम्हाला कमी पैशात कार मिळेल, पण तुम्हाला दर महिन्याला बँकेला EMI भरावा लागेल. प्रत्येक महिन्याचा EMI तुमच्या आर्थिक अडचणीत भर घालू शकतो. अशावेळी कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.
कार लोन घेण्यापूर्वी तुमचा पगार तपासा
अनेक जण कर्ज घेऊन कार खरेदी करतात पण नंतर ते गाडीचा EMI भरू शकत नाहीत. कारण त्यांच्या महिन्याच्या पगारातील अर्धा किंवा त्याहून अधिक हिस्सा EMI भरण्यात जातो. अशा वेळी बाकीचा खर्च करणे खूप अवघड होऊन बसते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कार लोन घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा पगार लक्षात ठेवला पाहिजे. कार लोन घेण्यापूर्वी तुमचा मासिक पगार किती असावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.
‘हे’ सूत्र समजून घ्या
कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. येथे 20 म्हणजे 20 टक्के डाऊन पेमेंट, म्हणजेच कार खरेदी करताना तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 20 टक्के इतके डाउन पेमेंट करावे लागेल. 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी, तुम्ही 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे कर्ज घेऊ नये. तर 10 म्हणजे पगाराच्या 10 टक्के. तुमचा मासिक EMI तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्क्यांपर्यंत असावा. जर तुमचा पगार दरमहा 1 लाख रुपये असेल तर तुमच्याकडे 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक EMI असणे आवश्यक आहे.