फेसबुक आणि Twitter पासून वाचवा तुमचा खासगी डेटा, लक्षात असुद्या या 6 टिप्स
दररोज असंख्य भारतीय आपली खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामुळे डेटा लिक होण्याची मोठी समस्या आहे.
मुंबई : जेव्हा ऑनलाईन प्रायव्हसीचा (Online Privacy) विषय येतो तेव्हा लोक फार गंभीरतेने घेत नाहीत. पण आपली कुठलीही माहिती ऑनलाईन शेअर करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला यातून मोठा धोका आहे. यामध्ये सोशल मीडिया वेबसाइट्स आणि अॅप्सचाही समावेश आहे. दररोज असंख्य भारतीय आपली खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतात. (by these 6 ways save your personal data from websites like facebook and twitter)
खरंतर, फेसबुक आणि Google सारख्या प्लॅटफॉर्मवर अशा काही जाहिराी डिझाइन केल्या गेल्या आहेत ज्यामध्ये तुमच्या खासगी माहितीवर लक्ष ठेवलं जातं. यामुळे तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. अशात असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही काही विशिष्ट गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमचा वैयक्तिक डेटा चोरणार्या वेबसाईट्सला रोखू शकता. आता तुमचा डेटा कोण वाचणार आणि कोण नाही याचे अधिकार वापरकर्त्याला देण्यात आले आहेत.
कसं कराल जाहिरातींना मॅनेज
तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरातदारांवर बंदी घालू शकता. यामध्ये प्रायव्हसी आणि जाहिरात सेटिंग्जद्वारे तुम्ही लक्ष ठेऊ शकता. तुम्ही ट्विटरवर ‘Off-Twitter Activity’ आणि फेसबुकवर ‘Ads Shown off of Facebook’ यासारख्या सोशल मीडियावर ट्रॅकिंग आणि जाहिराती थांबवू शकता.
लोकेशन ट्रॅकिंग बंद करा
तुमच्या फोटोंमधूनदेखील लोकेशन ट्रॅकिंग, हिस्ट्री, अगदी मेटाडेटासुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अॅप्सना माहिती गोळा करण्याची परवानगी देतं. त्यामुळे आपल्या सर्व हालचालींना इतरांना ट्रक करण्यापासून रोखण्यासाठी लोकेशन ट्रॅकिंग बंद करा. तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही सेटिंग्ज – प्रायव्हसी – लोकेशन शेअरिंग बंद करू शकता.
कुठेही लॉगइन करू नका
Twitter आणि TikTok सारख्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची माहिती शेअर करण्यासाठी लॉगइन करण्याची गरज नाही. लॉगइन केल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर तुमचा डेटा वाचला जातो.
अॅप आणि गेम्सची परवानगी रद्द करा
अनेक अॅप्स तुमचं लोकेशन ऑन ठेवण्यासाठी विचारतात. पण त्यामुळे तुमचा डेटा चोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे महत्त्वाचे अॅप्स आणि गेम्सची परवानगी रद्द करा.
कुठल्याही जाहिरातींवर क्लिक करू नका
सध्या सोशल मीडियावर आणि प्रत्येक अॅपवर अनेक जाहिराती येत असतात. यावर क्लिक करू नका. यानेदेखील तुमचा डेटा लिक होऊ शकतो.
बर्नर ईमेल पत्ता तयार करा
बर्नर ईमेल म्हणजे वेगळा ईमेल आयडी. आपल्या वैयक्तिक ईमेल पत्त्याव्यतिरिक्त, तुम्ही एक स्वतंत्र आयडीसुद्धा तयार करू शकता. जो इतर कामांसाठी वापरला जाईल. (by these 6 ways save your personal data from websites like facebook and twitter)
संबंधित बातम्या –
एकदा चार्ज केल्यास 40 तास चालणार, Boat Rockerz 255 Pro+ चं भारतात लाँचिंग, किंमत फक्त…
डेटिंग अॅपद्वारे लोकांना प्रेम मिळवून देणारी व्हिटनी, ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला
Realme X7 मिळणार फ्लॅट 2000 रुपयांचं डिस्काऊंट, आजच करा बूकिंग
(by these 6 ways save your personal data from websites like facebook and twitter)