Lost Mobile Tracking System : आता मोबाईल चोरट्यांची नाही खैर, अवघ्या काही मिनिटांतच खल्लास खेळ!

Lost Mobile Tracking System : आजपासून सरकारच मोबाईल चोरट्यावर मोर होणार आहे. मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काही मिनिटांतच त्याची माहिती मिळविता येणार आहे. आज, 17 मेपासून ही यंत्रणा सुरु होत आहे.

Lost Mobile Tracking System : आता मोबाईल चोरट्यांची नाही खैर, अवघ्या काही मिनिटांतच खल्लास खेळ!
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 3:49 PM

नवी दिल्ली : भारतात सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) अनेक घटना घडतात. तर काही जणांना विसरभोळेपणाचा फटका बसतो. महागडे स्मार्टफोन गमावण्याच्या घटना देशात नित्याच्याच आहेत. हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पण तो लागलीच मिळण्याची कसरत करावी लागते. पण आता हे चित्र बदलणार आहे. आजपासून सरकारच मोबाईल चोरट्यावर मोर होणार आहे. मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काही मिनिटांतच त्याची माहिती मिळविता येणार आहे. आज, 17 मेपासून ही यंत्रणा सुरु होत आहे. मोबाईल ट्रेसिंग सिस्टिम (Lost Mobile Tracking System) आजपासून सुरु होणार. केंद्र सरकारने (Central Government) त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या यंत्रणेमुळे तुमचा हरवलेला, चोरलेला मोबाईल असा पटकन सापडणार आहे..

महाराष्ट्रासह या राज्यात प्रयोग केंद्र सरकार ही निगराणी प्रणाली (Tracking System) आजपासून सुरु करणार आहे. या यंत्रणेमुळे देशभरातील मोबाईलधारकांना मोबाईल चोरीला गेल्यास, हरवल्यास मोबाईल ब्लॉक करण्याची सुविधा मिळेल. मोबाईल कुठे आहे, त्याची माहिती मिळेल. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (CDOT) काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यासाठीची उपकरणे बसविणार आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक आणि ईशान्य क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु होत आहे.

मोबाईल करता येईल ब्लॉक देशभरात ही प्रणाली लवकरच कार्यान्वीत होईल. सीआयआयआर प्रणाली 17 मे पासून देशभरातील काही ठिकाणी सुरु होत आहे. सीडॅकचे मुख्य कार्यपालक अधिकारी आणि चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी देशात कधी ही सेवा सुरु होईल याविषयीची निश्चित तारखेविषयी अधिकृत माहिती दिली नाही. येत्या तीन महिन्यात संपूर्ण देशात ही प्रणाली सुरु होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रणालीमुळे ग्राहक, मोबाईल वापरकर्ते मोबाईल फोन ब्लॉक अथवा ट्रॅक करु शकतात. सीडॅकने मोबाईल फोन शोधण्यासाठी पूर्वीच्याच प्रणालीत काही बदल केले असून त्यात काही खास फिचर्स जोडले आहेत.

हे सुद्धा वाचा

चोरटे पकडले जातील भारतात मोबाईल उपकरणांच्या विक्रीपूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय IMEI-15 अंकी संख्या) हा क्रमांक असणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. मोबाईल नेटवर्ककडे हा IMEI-15 अंकी क्रमांक असेल. त्यामुळे मोबाईल चोरी झाल्यावर नेटवर्कवरुन त्याची माहिती मिळेल. तसेच मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसेल. या यंत्रणेमुळे मोबाईल चोरटे लवकर पकडले जातील. तसेच मोबाईल हरवल्यास, विसरल्यास त्याचा थांगपत्ता लावता येईल. पोलिसांना पण या यंत्रणेमुळे चोरट्यांचा शोध घेणे सोपे होईल.

CEIR Portal केंद्र सरकारने CEIR Portal सुरु केले आहे. या पोर्टलवर हरवलेला, विसरलेला, चोरलेल्या स्मार्टफोनचे ट्रॅकिंग करता येईल. या यंत्रणेची चाचपणी सुरुवातीला काही राज्यात आजपासून करण्यात येत आहे. आता देशभरातील मोबाईलधारकांना त्याचा फायदा होईल. CEIR पोर्टलवर लॉगिन करुन तुम्हाला हरवलेला मोबाईल ब्लॉक करता येईल. पण त्यासाठी FIR ची कॉपी आणि मोबाईलचा तपशील लागेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.