WhatsApp ला टक्कर देणारं Signal अ‍ॅप ‘या’ देशात कायमस्वरुपी बॅन

जगभरातले युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला डावलून सिग्नल अ‍ॅपकडे वळलेले असताना एका देशात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

WhatsApp ला टक्कर देणारं Signal अ‍ॅप ‘या’ देशात कायमस्वरुपी बॅन
Messaging App Signal
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 2:23 PM

मुंबई : प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपला चांगलाच फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप (Signal Messaging app) मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अ‍ॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत सिग्नल अ‍ॅप (Signal App) टॉपवर आहेत. (China Appears to Block Popular Encrypted Messaging App Signal)

जगभरातले युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला डावलून सिग्नल अ‍ॅपकडे वळलेले असताना एका देशात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या देशात सिग्नल अ‍ॅपवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. या देशाचं नाव आहे चीन. सर्वांनाच माहिती आहे की, चीनमधील सरकारचं देशातील सोशल मीडिया सेवा, Flow of Information वर नियंत्रण आहे. मंगळवारपासून सिग्नल अ‍ॅप वापरण्यासाठी चिनी युजर्सना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कची मदत घ्यावी लागली. VPN च्या मदतीने तुम्हाला कोणत्याही ब्लॉक वेबसाईटवर प्रवेश करता येतो. त्याचाच वापर करुन चिनी युजर्स सिग्लन अॅपचा वापर करत आहेत.

सिग्नल अ‍ॅप आता चीनमध्ये ब्लॉक केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. पूर्वी हे अ‍ॅप चिनी युजर्ससाठी एन्क्रिप्टेड मेसेजिंग टूल होते. परंतु आता त्यावर बंदी घातली गेली आहे. चीनी वापरकर्त्यांनी मंगळवारी सांगितले की, जोपर्यंत VPN सेवा वापरत नाहीत तोपर्यंत ते अ‍ॅप कनेक्ट करु शकत नाहीत. कारण त्यांचे व्हीपीएन मेसेजेस फेल होत आहेत.

फेबसुक, गुगल आणि ट्विटरही बॅन

चीनमध्ये फेसबुक, गुगल आणि ट्विटर यापूर्वीच ब्लॉक केले गेले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध सोशल ऑडिओ प्लॅटफॉर्म क्लब हाऊसही बंद करण्यात आलं आहे. चिनी युजर्सनी अ‍ॅपवर रियल टाईम ऑडिओ डिस्कशनमध्ये भाग घेण्यास सुरुवात करताच सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

WeChat वरी कंटेंटवर सरकारचं नियंत्रण

सिग्नलकडून मेसेज आणि कॉलिंग सेवेसाठी एंड टू एंड एन्क्रिप्शनचा वापर केला जातो. त्यामुळे कोणीही तुमचे चॅट्स वाचू शकत नाही, तसेच कोणीही तुमचे कॉल्स ऐकू शकत नाही. सिग्नलचं गोपनीयता धोरण पाहून मोठ्या प्रमाणात चिनी युजर्स सिग्नल अ‍ॅपचा वापर करु लागले होते. चीनमध्ये WeChat चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. WeChat वरील राजकीय मेसेज आणि कंटेंट्सवर तिथल्या सरकारचं निंयत्रण आहे.

संबंधित बातम्या 

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

(China Appears to Block Popular Encrypted Messaging App Signal)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.