AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chinese Apps | अ‍ॅप बंदीच्या पावलांनी चीनची नाकाबंदी, सोशल मीडियातून चिनी सिन्ड्रोम संपण्यास सुरुवात?

चीनने विविध अ‍ॅपचा वापर करुन चिनी तंत्रज्ञान, उत्पादनाचा पुरस्कार करणारी पिढी तयार करण्याचे काम केले.

Chinese Apps | अ‍ॅप बंदीच्या पावलांनी चीनची नाकाबंदी, सोशल मीडियातून चिनी सिन्ड्रोम संपण्यास सुरुवात?
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 9:27 AM

नागपूर : केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षेला धोका ठरु (Chinese 59 Apps Block) शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपला देशात बंदी घालण्यात आली आहे. यात तरुणाला वेड लावणाऱ्या tik-tok सारख्या अ‍ॅपचाही समावेश आहे. चीनची नाकाबंदी करण्यासाठी नागपुरातील तरुणांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. देश हितापुढे काहीही नाही, त्यामुळे चीनच्या नांग्या ठेचण्यासाठी चिनी अ‍ॅप काय, चिनी वस्तूंच्या बहिष्काराची तयारीही तरुणांची आहे (Chinese 59 Apps Block).

विविध अ‍ॅप तयार करायचे आणि याच अ‍ॅपच्या माध्यमातून बालवयीन तसेच, तरुणाईला जाळ्यात ओढायचं. त्यांना भविष्यातील ग्राहक बनवायचं. हा चीनचा छुपा अजेंडा आहे. चीनच्या या प्रयत्नाला केंद्र सरकारने जोरदार धक्का दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिक टॉकसारख्या चिनी अ‍ॅपच्या आहारी गेलेले, तरुणही देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं पुढे येऊन स्वागत करत आहेत.

चीनने विविध अ‍ॅपचा वापर करुन चिनी तंत्रज्ञान, उत्पादनाचा पुरस्कार करणारी पिढी तयार करण्याचे काम केले. चीनचे हे उद्योग म्हणजे ‘सोशल मीडिया मानसशास्त्रीय युद्ध’ आहे, असं मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी यांनी व्यक्त केलं आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून चीनने भारतीय सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांच्या मानसिकतेवर पकड मजबूत केली. अ‍ॅपवरील व्हिडीओतून चिनी उत्पादनाची सवय भारतीयांना लागेल, अशी गुप्त योजना चीनची होती. मात्र, आता सरकारने चीनची भारतीयांच्या मनावरील पकड सैल करण्यासाठी 59 अ‍ॅप बंद केले आहेत. त्यामुळे अ‍ॅप बंदीच्या पावलांनी चीनच्या नाकाबंदीची सुरुवात झाल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे.

एकेकाळी डोनाल्ड, छोटा भीम ही कार्टून लहान मुलांना आवडत होती. गेल्या काही वर्षात निन्जा, डॉरेमोन या कार्टूनने मुलांच्या मनाचा ठाव घेतला. ही मुले जशी मोठी होत गेली, तसे चीनने विविध अ‍ॅप आणून त्यांच्या मनावरील ताबा कायम ठेवला. या अ‍ॅपच्या माध्यमातून येणारे व्हिडीओ चीनचे उत्पादने, कारखान्यातील आकर्षक उत्पादननिर्मिती, तेथील स्टोर्सचा प्रसार करणारे होते. चीनचे अ‍ॅप बंद केल्याने भारतीयांच्या मनावरील चिनी अ‍ॅपचे गारुड संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता भारतीय सोशल मीडियाने व्यवसायिक दृष्ट्या परिपक्व होण्याची गरज सोशल माध्यमातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत (Chinese 59 Apps Block).

‘चायना सिंड्रोमने वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे भारतीयांच्या घराघरात चिनी उत्पादने पोहोचली. लहान मुलेही चिनी उत्पादनाचा हट्ट करीत असल्याने पालकांनाही पर्याय नाही. परंतु केंद्र सरकारच्या अ‍ॅपबंदीच्या निर्णयामुळे चिनी अ‍ॅप मोबाईलमधून डिलीट होतील. त्यामुळे चायना सिंड्रोम काढणे शक्य होणार असून स्वदेशी उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ काबिज करता येईल. हिच पाऊले आत्मनिर्भर भारताकडे जाणारी आहे. मात्र, उत्पादक, व्यावसायिकांना सोशल मीडिया साक्षर व्हावे लागणार आहे. शिवाय, ऑनलाईन बाजारपेठेसाठी नवनव्या संकल्पना आत्मसात कराव्या लागतील’, असं मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केलं आहे.

टीक टॉकसारख्या अ‍ॅपच्या माध्यामातून काही सेकंदात कला व्यक्त केली जात होती. यासारख्या चिनी अ‍ॅपमधून देशात अनेक स्टार जन्माला घातले आहेत. अनेक कलाकारांना आपली कला व्यक्त करण्याची संधी मिळाली. पण, देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे चिनी अ‍ॅप बंदीचं नागपुरातील टीक टॉक स्टार आणि सोशल मीडिया स्टार स्वागत करत आहेत. पण हिच संधी आहे, भारतीय कंपन्यांनी या सर्व अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध करुन देऊन, पुन्हा एकदा सोशल मीडिया किंवा टिक-टॉक सारख्या अ‍ॅपवर व्यक्त होणाऱ्या तरुणांना, कलाकारांना सोशल माध्यमाचा नवा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याची (Chinese 59 Apps Block).

संबंधित बातम्या :

Chinese Apps Ban | चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

Chinese Apps Ban | Tik Tok, Share IT सह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, वाचा संपूर्ण यादी

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.