…म्हणून पुन्हा 54 चीनी अ‍ॅपवर बंदी; अर्थमंत्र्यांचा खुलासा

गेल्या आठवड्यात भारताने सुरक्षा (Security) आणि गोपनीयतेशी (Confidential) संबंधित मुद्द्यांवरून चीनशी संबंधित 54 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या आधी देखील अनेक चिनी अ‍ॅप्सवर भारताकडून बंदी घालण्यात आली आहे.

...म्हणून पुन्हा 54 चीनी अ‍ॅपवर बंदी; अर्थमंत्र्यांचा खुलासा
निर्मला सितारमण
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 9:03 AM

मुंबई : गेल्या आठवड्यात भारताने सुरक्षा (Security) आणि गोपनीयतेशी (Confidential) संबंधित मुद्द्यांवरून चीनशी संबंधित 54 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या आधी देखील अनेक चिनी अ‍ॅप्सवर भारताकडून बंदी घालण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. चिनी अ‍ॅप्सवर (Chinese apps) बंदी घालण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, संबंधित अ‍ॅप्सच्या माध्यमातून विविध प्रकारे देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत होते. यातून देशाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सदर अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या निर्णयामुळे देशातील व्यापाराचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नसल्याचेही सांगण्यात आले. गरजेनुसार चीनसोबत व्यापार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयाचा भारत आणि चीनमधील व्यापारातील देशांतर्गत व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, चीनच्या अ‍ॅप्सवर भारताने निर्बंध लादण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्यामुळे याचा व्यापारावर कुठलाही दीर्घकालीन परिणाम होणार नाही.

काय म्हणाल्या अर्थमंत्री?

अ‍ॅप्सवर बंदी आणि त्याचा व्यवसायावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हे अ‍ॅप्स कोणत्या ना कोणत्या मार्गाने देशासाठी नुकसानकारक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर या निर्णयाचा देशातील आयातदार आणि निर्यातदारांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ताज्या निर्णयानंतरही आयातदारांच्या गरजा लक्षात घेऊनच व्यवसाय सुरू आहे. भारताने सोमवारी सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांवरून टेंसेंट एक्सराइवर, नाइस व्हिडिओ बायडु आणि वीवा वीडियो एडीटर यासह चीनशी संबंधित असलेल्या 54 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या 54 चिनी अ‍ॅप्सनी वापरकर्त्यांकडून संवेदनशील माहिती गोळा केली. हे अ‍ॅप्सवर वापरकर्त्यांकडून गोळा केलेल्या माहितीचा गैरवापर करत असल्याचा आरोप आहे.

अ‍ॅपमुळे सुरक्षा धोक्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या 54 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या अंतरिम सूचना जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात मंत्रालयाला विनंती करण्यात आली होती. बंदी अंतर्गत असलेल्या अ‍ॅप्समध्ये ब्युटी कॅमेरा, स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा: सेल्फी कॅमेरा, राइज ऑफ किंगडम्स: लॉस्ट क्रुसेड, वीवा व्हिडिओ एडीटर, टेनसेंट एक्सरिव्हर यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे.

यापूर्वीही घातली अनेक अ‍ॅपवर बंदी

दरम्यान, 2020 मध्येही अनेक प्रमुख चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. जून 2020 मध्ये, सरकारने टिकटॉक आणि ‘युसी’ ब्राउझर सारख्या 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. जून 2020 मध्ये, लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले. त्यानंतर या बंदी घातलेल्या अ‍ॅप्सचा बनावट भाग म्हणून लॉन्च करण्यात आलेल्या अ‍ॅप्सवरही  ऑगस्ट 2020 मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप पबजीसह अन्य 118 चिनी अ‍ॅप्सवरही बंदी घातली होती.

संबंधित बातम्या

30 स्पोर्ट्स मोड, इनबिल्ट गेम्ससह Fire Boltt Ninja Calling Smartwatch बाजारात, आजपासून सेल Live

20 दिवसांचा बॅटरी बॅकअप, ब्लूटूथ कॉलिंग, इनबिल्ट गेम्ससह 2900 रुपयांच्या रेंजमध्ये शानदार स्मार्टवॉच लाँच

Poco M4 Pro 5G चा आज पहिला सेल, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.