जादूई तंत्रज्ञान, लवकरच रंग बदलणारा फोन बाजारात येण्याची चिन्हं
Ice Universe या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये फोनच्या मागील बाजूचा रंग बदलताना दिसत आहे. (Color changing smartphone)
मुंबई : स्मार्टफोन खरेदी करताना इतर फीचर्ससोबतच ग्राहकांच सर्वाधिक भर फोनचा रंग कसा आहे यावर असतो. फोनचा रंग आकर्षक असावा अशी सर्वांची इच्छा असते. मात्र एकच रंग वापरुन कंटाळाही येऊ शकतो. पण आता त्यावरही पर्याय उपलब्ध झाला आहे. तुमच्या फोनचा रंग दररोज बदलू शकणार आहे. (Color changing smartphone)
Ice Universe या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये फोनच्या मागील बाजूचा रंग बदलताना दिसत आहे.
A mobile phone brand is developing a mobile phone with a discoloration rear case, which can adjust the speed of discoloration. Maybe the smart phone will only have one color in the future: discoloration pic.twitter.com/kSg5NSD0tL
— Ice universe (@UniverseIce) September 3, 2020
रंग बदलणारा हा स्मार्टफोन कोणत्या कंपनीने बनवला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. ट्विटमध्ये नमूद केले आहे की, डिझाईनच्या बाबतीत हे एक अतिशय वेगळ्या प्रकाराचे यंत्र आहे. या स्मार्टफोनच्या मागील भागाचा रंग बदलू शकतो आणि वापरकर्ता या रंग बदलण्याच्या प्रकियेची गती सुद्धा ठरवू शकतो. म्हणजे काही सेकंदाच्या अंतरानंतर फोनच्या मागील भागाचा रंग एकानंतर दुसरा असा दिसू शकतो.
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या स्मार्टफोनचे कॅमेरा युनिट सील केलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत हे सांगणे कठीण आहे की, हा फोन कोणत्या कंपनीने तयार केला आहे. याबाबत अनेक अफवाही पसरल्या आहेत. या अफवांनुसार नुबिया (Nubia) हे अनोखे तंत्र विकसित करु शकते. या ब्रँडने मागील भागावर यापूर्वीच दुय्यम स्क्रीन असलेला स्मार्टफोन आणला आहे. फोनच्या वरच्या भागातील उजव्या कोपऱ्यात सील केलेला कॅमेराचा भाग व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रंग बदलणारा स्मार्टफोन ही वेगळी आणि अनोखी संकल्पना आहे. पण प्रत्यक्षात तो किती उपयोगात आणला जाईल, याबद्दल आता काहीच सांगणे योग्य ठरणार नाही. वेगवेगळ्या कंपन्या वापरकर्त्यांना मर्यादित रंगांचे प्रकार निवडण्याचा पर्याय देतात, परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते आपल्या आवडत्या रंगाच्या फोनचा वापर करू शकतील आणि आवश्यकतेनुसार फोनचा रंग बदलू शकतात. अंतिम उत्पादन समोर आल्यानंतर या तंत्रज्ञानावर अधिक प्रयोग केले जाऊ शकतात.
(Color changing smartphone)
संबंधित बातम्या
Chinese Apps Ban | भारताचा चीनला पुन्हा दणका, PubG सह 118 अॅप्सवर बंदी, वाचा संपूर्ण यादी
तुमच्या मोबाईलमधील PubG सह Banned Chinese अॅप्सचं पुढे काय होणार?