Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tesla चे सीईओ Elon Musk वर हॅकर्सचा हल्ला, क्रिप्टोकरन्सी पॉवरवरुन धमकी

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांना हॅकर्सच्या एका ग्रुपने लक्ष्य केले आहे. (Tesla CEO targeted by anonymous hacker)

Tesla चे सीईओ Elon Musk वर हॅकर्सचा हल्ला, क्रिप्टोकरन्सी पॉवरवरुन धमकी
Elon Musk
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 4:52 PM

मुंबई : TMZ च्या वृत्तानुसार, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांना हॅकर्सच्या एका ग्रुपने लक्ष्य केले आहे. हा हॅकर्सनी अलिकडच्या काळात काही मोठे डिजिटल घोटाळे केले आहेत. हॅकर ग्रुपद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हँकर्सने जगभरातील क्रिप्टोकरन्सी मार्केटवर वर्चस्व प्रस्थापिक करु इच्छिणाऱ्या मस्क यांच्यावर टीका केली आहे. (Cryptocurrency Fall : Tesla CEO Elon Musk targeted by anonymous hacker group)

ज्या अज्ञात अकाउंटवरुन व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे, त्यावर असा दावा करण्यात आला आहे की टेस्ला प्रमुखांची क्रिप्टोकरन्सीसबद्दल अभिमानी वृत्ती खूपच वाईट आहे. हा व्हिडीओ खासकरुन बिटकॉइनशी संबंधित आहे, ज्याबद्दल मस्क यांनी गेल्या काही दिवसांत ट्विट्स केले होते. त्यांच्या ट्वीट्समुळे बिटकॉइनचं मूल्य घसरू लागलं आहे.

हॅकर ग्रुपने म्हटलं आहे की, एलन मस्क हे superiority complex ने पीडित आहेत. एकदा तर मस्क यांनी स्वत:ला ‘मंगळाचा सम्राट’ म्हणून संबोधित केलं होतं. ग्रुपने असा दावा केला आहे की, क्रिप्टोकरन्सीजच्या सतत ट्रोलिंगमुळे कामगार वर्गातील लोकांना आणि त्यांच्या प्रॉस्पेक्ट्सना नुकसान सहन करावे लागत आहे. मस्क हा सामान्य माणसाचा मित्र नाही.

जगभरातील लोकांचा रोष

एलन मस्क (Elon Musk) यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) मोठा फटका बसला. एलन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचा मार्केटमधील भाव दिवसेंदिवस घसरत चालला आहे. याबद्दल त्यांनी आज अजून एक ट्विट केलं, या ट्विटनंतर मस्क यांना जगभरातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

मस्क यांच्यामुळे बिटकॉइनचे मूल्य घसरले

एलन मस्क यांनी नेहमीच क्रिप्टोकरन्सीचे समर्थन केलं आहे आणि Bitcoin तसेच Dogecoin सारख्या क्रिप्टोकरन्सीवर ते सतत ट्वीट करत असतात. त्यांच्या प्रत्येक ट्विटचा बिटकॉइनवर, त्याच्या मूल्यावर जबरदस्त प्रभाव पाडला आहे आणि त्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसून आली आहे. परंतु एलन मस्क यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटने अनेक लोकांना दुखावले आहे. एलन मस्क यांनी अलीकडेच आपल्या ट्विटरवर जाहीर केले की, टेस्ला यापुढे बिटकॉइनमध्ये इलेक्ट्रिक कारसाठी देय (पेमेंट) स्वीकारणार नाही. तेव्हापासून, बिटकॉइनचे मूल्य सातत्याने कमी होत आहे.

‘मोस्ट-हेटेड’ पर्सन?

एलन मस्क यांनी बिटकॉइन न घेण्याच्या निर्णय घेतल्यानंतर लोक त्यांचा विरोध करीत आहेत. एलन मस्क यांच्या ट्विटमुळे लोक संतप्त झाले आहेत. एका व्यक्तीने त्यांना ‘मोस्ट-हेटेड’ पर्सन (अशी व्यक्ती जिचा सर्वात जास्त तिरस्कार केला जातो) ही पदवीही दिली आहे. क्रिप्टोकरन्सीचा भाव कोलमडल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्यभराची जमा पुंजी गमावली आहे, लोकांनी यासाठी मस्क यांना जबाबदार धरले आहे. एका युजरने असे म्हटले आहे की, एलन मस्कवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या सेव्हिंगमधील मोठी रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली होती, ते सर्व पैसे त्यांनी आता गमावले आहेत.

संबंधित बातम्या

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करुन मालामाल होण्याची संधी, पण गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

भारताला 7 हजार कोटींची मदत करणाऱ्या उद्योजकानं एलन मस्कला क्रिप्टोकरन्सीवरुन खडसावलं, म्हणाला…

(Cryptocurrency Fall : Tesla CEO Elon Musk targeted by anonymous hacker group)

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.