Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर घर की कहानी… या 7 गोष्टींमुळे विजेचं बिल अधिक येतंय?; मग या टिप्स फॉलो करा आणि पहा..

घरातील अनेक उपकरणे विजेचे जास्त बिल येण्यास कारणीभूत असतात. एसी, वॉटर हिटर, वॉशिंग मशीन, फ्रिज आणि इलेक्ट्रिक ओव्हनसारखी उपकरणे जास्त वीज खेचतात. विजेचा खर्च कमी करण्यासाठी एलईडी बल्ब वापरणे, एसीचे तापमान नियंत्रित करणे, फ्रिज नियमित साफ करणे आणि जुनी उपकरणे बदलणे महत्त्वाचे आहे.

घर घर की कहानी... या 7 गोष्टींमुळे विजेचं बिल अधिक येतंय?; मग या टिप्स फॉलो करा आणि पहा..
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 2:30 PM

घरातील अनेक गोष्टींमुळे विजेचं बिल अधिक येत असतं. पण पंख्यामुळे अधिक बिल येतं हा आपला समज आहे. हा समज दूर करा. घरात अशा काही गोष्टी असतात की त्यामुळे वीज मोठ्या प्रमाणावर खेचली जाते. त्यामुळे युनिट्स अधिक पडतात आणि विजेचं बिल अधिक येतं. अनेक उपकरणांमुळे हे होतं. ही उपकरणे कोणती आहेत? आणि विजेचं बिल कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा.

या उपकरणांमुळे विजेचं बिल जास्त येतं?

एसी

एसीमुळे वीज अधिक खेचली जाते. त्यामुळे विजेचं बिल अधिक येतं. पण नवीन तंत्रज्ञानाचा एसी जास्त ऊर्जा बचत करणारा असतो, उदाहरणार्थ, इन्व्हर्टर एसी. वर्षातून किमान एकदा एसीची फ्लुइड लेव्हल, कूलंट चार्ज आणि इतर सर्व बाबी तपासून घ्या.

वॉटर हिटर

एसीप्रमाणेच वॉटर हिटर अधिक वीज खेचते. त्यामुळे विजेचं बिल अधिक येतं. विशेषतः थंडीत याचा वापर जास्त होतो. थर्मोस्टॅट जितका जास्त असेल, तितका विजेचा खर्च वाढतो. पाणी 48 ते 50 डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवल्याने विजेची बचत होते.

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनच्या प्रकारावर विजेचा खर्च अवलंबून असतो. अनेक आधुनिक मशीन्समध्ये कपडे वाळवण्यासाठी ड्रायर असतो. त्याने विजेचा खर्च वाढतो. खर्च कमी करायचा असल्यास, कपडे मशीन्समध्ये न वाळवता सूर्यप्रकाशात वाळवावेत. प्रत्येक वेळी धुलाई केल्यानंतर मशीन्स साफ करा.

फ्रिज (रिफ्रिजरेटर)

प्रत्येक घरात रिफ्रिजरेटर 24 तास चालतो, त्यामुळे विजेचं बिल जास्त येतं. जर तुम्ही जुन्या मॉडेलचा फ्रिज वापरत असाल, तर विजेचा खर्च जास्त होईल. खर्च कमी करायचा असेल, तर नवीन मॉडेलचा फ्रिज घ्या. तसेच, डीप फ्रीजरमध्ये बर्फ जमू देऊ नका. नियमितपणे फ्रिज साफ करा.

इलेक्ट्रिक ओव्हन

खाद्यपदार्थ गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर जास्त विजेचा खर्च करतो. मायक्रोवेव्ह किंवा ओटीजी जास्त वेळ चालविल्यास आणि वारंवार चालवल्यास विजेचा खर्च वाढतो. अनेक लोक मायक्रोवेव्ह किंवा ओटीजीमध्ये शिजवतात, किव्हा केक-पुडिंग करतात. यामुळे वेळ जास्त लागतो आणि विजेचा खर्च वाढतो.

गिझर

गिझर वेळे नुसार चालवावा लागतो. जास्त वेळ चालविल्यास विजेचा खर्च अचानक वाढतो.

हेयर ड्रायर

दररोज हेयर ड्रायर वापरण्यामुळे वीज अधिक वापरली जाते. दररोज 4 मिनिटं हॅेयर ड्रायर वापरल्यास आठवड्यात 1.05 किलोवॅट प्रति तास विजेचा खर्च होईल, आणि 15 मिनिटं दररोज वापरल्यास आठवड्याच्या शेवटी विजेचा खर्च 3.15 किलोवॅट प्रति तास होईल.

विजेचा खर्च कमी करण्याच्या टिप्स

१) घरात एलईडी लाइट लावा. या लाइट्समध्ये विजेचा खर्च कमी होतो.

२) एसीच्या आउटलेट्स अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यावर थेट सूर्यप्रकाश पडत नसेल. पण एसीच्या यंत्राला झाकण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे यंत्र खराब होऊ शकते. बारं बार एसी चालू आणि बंद करू नका. तापमान 24 डिग्री सेल्सियस ठेवणे सर्वोत्तम आहे.

३) फ्रिजला भिंतीला लागून ठेवू नका. फ्रिज आणि भिंतीदरम्यान किमान 3-4 इंच अंतर ठेवा. तसेच, गारठा झालेलं अन्न फ्रिजमध्ये ठेऊ नका.

४) कम्प्युटर किंवा टीव्ही स्टँडबाय मोडवर ठेऊ नका.

५) टीव्ही किंवा एसी वापरल्यानंतर स्विच बोर्डमधून त्यांना बंद करणे विसरू नका.

६) एसी आणि इतर विद्युत उपकरणांसाठी प्लग इन टाइमर वापरू शकता. यामुळे जास्त विजेचा वापर होणार नाही. सामान्य रिग्युलटरऐवजी इलेक्ट्रॉनिक आणि आधुनिक रिग्युलटर वापरणे उत्तम. यामुळे विजेचा खर्च कमी होईल.

७) जुन्या विद्युत उपकरणांचा वापर विजेचा खर्च वाढवतो. त्यामुळे 10-12 वर्षे जुने उपकरण बदलून नवीन उपकरणं वापरणे उत्तम.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.