Cyber Crime : बँकिंग फ्रॉडच्या जाळ्यात अडकल्यास लगेच करा ‘ हे ‘ काम ; परत मिळू शकतील पैसे !

Fake Profile: बऱ्याच वेळेस सोशल मीडियावर एखादी व्यक्ती इतर व्यक्तीच्या नावे बनावट प्रोफाईल बनवते. आयटी ॲक्ट 2000 अंतर्गत फेक सोशल मीडिया प्रोफाईल बाबत तरदूद करण्यात आली आहे.

Cyber Crime : बँकिंग फ्रॉडच्या जाळ्यात अडकल्यास लगेच करा ' हे ' काम ; परत मिळू शकतील पैसे !
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:22 PM

Banking Fraud: आजकाल सर्वांकडेच इंटरनेट (Internet) असते, त्यामुळे त्याचा वापरही वाढला आहे. लोकांची कामे सहज, सोप्या पद्धतीने व्हावीत यासाठी सरकारतर्फेही अनेक कामे ऑनलाइन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचावे यासाठीही सरकार (Government) प्रयत्नशील आहे. मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच त्याचा गैरवापर (misuse of internet)होण्याचे प्रकारही खूप वाढले आहेत. असे अनेक गुन्हे घडल्याची माहिती समोर आली आहे, जे सायबर क्राइम (Cyber crime) अंतर्गत येतात. सायबर क्राइमविरोधात लढा देण्यासाठी सरकारतर्फ कायदेही तयार करण्यात आले आहेत. सायबर क्राईमच्या घटना रोखण्यासाठी सरकारतर्फे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (Information Technology Act, 2000) लागू करण्यात आला होता.

सायबर क्राइमच्या घटना वाढल्या :

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 विषयी माहिती देताना चुरू येथील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. सैनी यांनी सांगितले की, इंटरनेटच्या वापरामुळे त्याचे उपयोग तर वाढले पण त्याचा गैरवापरही वाढला. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून बेकायदा काम करणे, चोरी करणे, इलेक्ट्रॉनिक मनी लॉन्ड्रिंग करणे इत्यादी घडणाऱ्या घटना या सायबर गुन्हे आहेत, असे मत डॉ. एस. के. सैनी यांनी व्यक्त केले. त्यापासून वाचण्यासाठी सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणला होता. सायबर क्राइम अंतर्गत, गुन्हा घडतेवेळी एखाद्या व्यक्तीने घटनास्थळी शारीरिकरित्या उपस्थित राहणे हे आवश्यक नाही. तसेच सायबर दहशतवाद (Cyber Terrorism) हाही सायबर क्राईमच्या कॅटॅगरीत येतो.

बँकिंग फ्रॉड :

इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना लुटणे, फसवणूक करणे अशा गोष्टीही वाढल्याचे सैनी यांनी सांगितले. त्याचसोबत बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणातही लक्षणीय वाढ झाली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. बँकिंग फ्रॉडमध्ये एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास त्याच्यावर आयटी ॲक्ट 2000 च्या कलम 77 बी, 66 डी अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याशिवाय आयपीसी कलम 419, 420 आणि 465 हेही त्यात जोडता येऊ शकते. बँकिंग फ्रॉड झाला असेल तर लवकरात लवकर त्याची तक्रार नोंदवावी. तुम्ही त्वरित तक्रार नोंदवली तर कारवाईही त्वरित होऊ शकेल आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढू शकते

इथे दाखल करा तक्रार :

एखादी व्यक्ती बँकिंग फ्रॉडच्या जाळ्यात अडकली किंवा इतर एखाद्या सायबर क्राईमची बळी ठरली, तर पीडित व्यक्ती भारत सरकारच्या https://cybercrime.gov.in/ या पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकते, असे सैनी यांनी सांगितले. त्याशिवाय पीडित व्यक्ती आपल्या जवळील पोलिस स्टेशनमध्ये जाऊनही सायबर क्राईमची तक्रार दाखल करू शकते.

बनावट प्रोफाईल :

बऱ्याच वेळा असं होतं की, एखादी व्यक्ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने बनावट प्रोफाईल बनवते. सैनी यांच्या सांगण्यानुसार, बनावट अथवा फेक सोशल मीडिया प्रोफाइलसंदर्भातही आयटी ॲक्ट, 2000 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. आयटी ॲक्ट 2000 च्या अंतर्गत कलम 66 B व 67 या अंतर्गत कारवाई करता येऊ शकते. तसेच जर कोणीही व्यक्ती डिजीटल सही अथवा स्वाक्षरीचा गैरवापर करत असेल तर आयटी ॲक्ट 2000 च्या 66 C, 71, 73 आणि 74 या कलमांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. त्याशिवाय आयपीसीचे कलम 463 आणि 465 देखील जोडता येईल.

सायबर दहशतवाद (Cyber Terrorism) :

एस.के. सैनी यांच्या सांगण्यानुसार पॉर्नोग्राफीसाठीही आयटी ॲक्ट, 2000 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफीसाठी आयटी ॲक्ट, 2000 च्या 67 A या कलमाअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. तसेच जर कोणतीही व्यक्ती सायबर दहशतवादात सहभागी असल्याचे आढळले तर आयटी ॲक्ट, 2000 च्या 43C कलमाअंतर्गत कारवाई करता येऊ शकते. सायबर दहशतवादामध्ये दोषी आढळल्यास आजन्म कारावासाची तरतूद आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.