Video | 5Gच्या दुष्परिणामांवर जुही चावलाने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली ‘फोन जादूवर काम करत नाहीत पण…’

अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) यांनी सोमवारी देशात ‘5 जी’ (5G Network) वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि नागरिक, प्राणी, वनस्पती आणि जीवजंतूवरील किरणोत्सर्गाच्या परिणामाशी संबंधित मुद्दे उपस्थित केले.

Video | 5Gच्या दुष्परिणामांवर जुही चावलाने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली ‘फोन जादूवर काम करत नाहीत पण...’
जुही चावला
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 2:22 PM

मुंबई : अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) यांनी सोमवारी देशात ‘5 जी’ (5G Network) वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि नागरिक, प्राणी, वनस्पती आणि जीवजंतूवरील किरणोत्सर्गाच्या परिणामाशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. याप्रकरणी दोन जून रोजी सुनावणी होणार आहे (Delhi High court Hearing on Juhi Chawla case against 5G wireless network in india).

जुहीने या प्रकरणात याचिका दाखल केल्यापासून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. बर्‍याच पोस्टमध्ये तिचे म्हणणे योग्य असल्याचे म्हटले जात आहे, तर बर्‍याच पोस्टमध्ये तिच्या विरुद्ध बोलले जात आहे. याबाबत जुही चावलाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणाली- “काही लोक म्हणाले की तुम्ही आताच कशा जाग्या झाल्या आहात? मला सांगायचे आहे की, मला आज जग आलेली नाही. तर, गेल्या 10 वर्षांपासून मी सेलफोन टॉवर्स, रेडिएशनबद्दल बोलत आहे. त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे फोनही काही जादूवर चालत नाहीत, ते रेडिओ व्हेव्सवर चालतात आणि या व्हेव्स वाढत आहेत.’

पाहा जुही चावलाचा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

जुही चावला आपल्या व्हिडीओत म्हणाली की, ‘1G ते 2G, 2G ते 3G, 3G ते 4G आणि आता 4G ते 5G… आपल्या वातावरणासाठी बरेच रेडिएशन तयार करत आहेत. जोपर्यंत एखादी गोष्ट संयमात आहे तोपर्यंत ती ठीक आहे, परंतु जेव्हा ती आवश्यकतेपेक्षा जास्त होते, तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागतात. 20-25 वर्षांपासून पसरत असलेल्या या किरणोत्सर्गावर कोणी अभ्यास केला आहे का? आपल्याकडे तंत्रज्ञान देखील आहे, त्याबद्दल फक्त संशोधन करा आणि त्याबद्दल काय मिळते ते पहा… ”( Delhi High court Hearing on Juhi Chawla case against 5G wireless network in india)

जूही चावलाचा 5 जी तंत्रज्ञानाला विरोध का?

जूही चावला म्हणाली की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली आहे की, 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं.

हा खटला न्यायमूर्ती सी हरीशंकर यांच्याकडे सुनावणीसाठी आला व त्यांनी हे प्रकरण दुसर्‍या खंडपीठाकडे सुनावणीसाठी हस्तांतरित केले आहे. यावर 2 जूनला सुनावणी होणार आहे. जुही चावला म्हणाली की, टेलिकॉम उद्योगाच्या योजना पूर्ण झाल्या तर कोणतीही व्यक्ती, कोणताही प्राणी, पक्षी, कोणताही कीटक आणि पृथ्वीवरील कोणत्याही वनस्पती त्याच्या परिणामांपासून सुटू शकणार नाहीत.

(Delhi High court Hearing on Juhi Chawla case against 5G wireless network in india)

हेही वाचा :

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.