जुना फोन विकताय ? पण त्याआधी ‘या’ गोष्टी Delete करा
Tips and Tricks : नवा फोन घेण्याच्या आनंदात आणि उत्साहात बऱ्याच वेळा जुन्या फोनकडे दुर्लक्ष होतं. पण त्या जुन्या फोनमध्ये अशी बरीच माहिती असते, जी इतक कोणालाही मिळाली तर बराच प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे फोन बदलताना जुन्या फोनचं काय करायचं ते समजून घ्या आणि त्या गोष्टी आवर्जून करा. नाहीतर तुमचाच त्रास वाढेल.
Mobile Tips : अँड्रॉईड असो किंवा iPhone, नवा फोन घ्यायचा म्हटल्यावर सर्वांच्यांच चेहऱ्यावर आनंद येतो. कधी एकदा नवा फोन हातात येतो आणि आपण त्याचे सगळे फीचर्स जाणून , तो वापरायला सुरूवात करतो, अशी उत्सुकता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर असते. पण कोणताही नवा फोन घेताना जसा तपासून घेता, काळजी घेता, तशीच काळजी जुना फोन विकतानाही घ्या. त्यामध्येच तुम्ही आत्तापर्यंत वापरत असलेला महत्वाचा डेटा, मेसेजस, ई-मेल्स अशी सगळी महत्वाची आणि वैयक्तिक माहिती असते. त्यामुळे ती कोण्या ऐऱ्या-गैऱ्याच्या हाती लागली तर तुमचाच प्रॉब्लेम वाढू शकतो.
जुना फोन विकण्याआधी किंवा तो एक्स्चेंज करण्याआधी काही गोष्टी नक्की फॉलो करा. तसं केलं नाही तर तुमचा डेटा लीक होऊ शकतो किंवा फोनमधील माहितीचा गैरवापर करून तुमचं अकाऊंटही रिकामं होऊ शकतं. त्यामुळे फोन बदलण्याची घाई न करता, आधी त्यातील’या’गोष्टी नक्कीच Delete कराव्यात. त्या कोणत्या, चला जाणून घेऊया.
फोनमधून डिलीट करा ‘या’ गोष्टी
जुना फोन विकायला जात असाल तर त्याआधीच त्या फोनमधील सर्व बँकिंग ॲप्स आठवणीने डिलीट करा. कारण आजकाल ही सर्व ॲप्स तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक्ड असतात, त्यामुळे त्यातूनच डेटा लीक होण्याचीही भीती असते. फक्त बँकिंग ॲप्स नव्हे कर यूपीआय ॲप्सही आवर्जून डिलीट करा. आर्थिक व्यवहारासंबंधी जी माहिती असेल ती कोणतीही जुन्या फोनमध्ये ठेवूच नका.
फोनमधून Remove करा ही माहिती
जुना फोन विकण्यापूर्वी तुमचे सर्व कॉल रेकॉर्जस आणि मेसेजेस वगैरे फोनमधून हटवा. असं केलं नाही तर भविष्यात तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागू शकतो.
क्लाऊड स्टोरेजचा करा वापर
तुम्ही जुना फोन विकत असाल तर नवा फोन नक्कीच घेणार. अशा वेळी जुना फोन विकण्यापूर्वी त्यातील फोटोज आणि व्हिडीओ हे Google Drive, Google Photos, Dropbox यांचा वापर करून त्यावरच सेव्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही फोटो, व्हिडीओ, फाईल्सचा सहज बॅकअप घेऊ शकता.
बॅकअप घेतल्यानंतर नव्या फोनमध्ये तुम्हाला बॅकअप घेतलेली सर्व माहिती एकत्रच सापडेल. पण तुम्ही बॅकअप न घेताच फोन आधीच फॉर्मॅट केला किंवा फोन असाच विकला तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात.
डिव्हाईस रिसेट करण्यापूर्वी करा हे काम
तुमचा स्मार्टफोन रिसेट करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या सर्व, एकूण-एक अकाऊंट्समधून आठवणीने लॉग-आऊट नक्की करा. मग ते गूगल अकाऊंट असो किंवा फेसबूक वा इन्स्टाग्राम. फोन रिसेट करण्यापूर्वीच सर्व ठिकाणी लॉग आऊट करावं.
ही ॲप्स जरूर हटवा
WhatsApp हे एक असे ॲप आहे जे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. हे ॲप मोबाईलमधून डिलीट किंवा uninstall करण्यापूर्वी त्यातील मेसेजसचाही बॅकअप नक्की घ्या. जेणेकरून नवा फोन घेतल्यावर तुम्हाला WhatsAppचा बॅकअप सहज घेता येईल. चॅटचे बॅकअप घेतले नाही तर नव्या फोनमध्ये तुम्हाला WhatsApp चे जुने मेसेजस मिळणार नाहीत.