WhatsApp वर व्हिडिओ शेअर करताय? तुरुंगात जावे लागेल, ‘हे’ नियम वाचा

WhatsApp Safety Tips: तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ शेअर करत असाल तर ही बातमी आधी वाचा. कारण, तुम्हाला कारागृहात जावे लागू शकते. मेसेजिंगसह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. परंतु कोणताही फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यापूर्वी म्हणजेच शेअर करण्यापूर्वी आपण लक्ष दिले पाहिजे. कारण, तुम्हाला कारागृहात जावे लागू शकते. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

WhatsApp वर व्हिडिओ शेअर करताय? तुरुंगात जावे लागेल, ‘हे’ नियम वाचा
व्हॉट्सअप व्हिडिओ
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 2:45 PM

WhatsApp Safety Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. आपण प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो आणि अगदी सहज कोणताही फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करतो. पण, तुम्हाला हे माहिती आहे का की, हे केल्याने तुम्हाला कारागृहात जावे लागू शकते. आता तुम्ही म्हणाल कसे, तर याविषयी जाणून घ्या.

‘असे’ व्हिडिओ शेअर करणे टाळा

व्हॉट्सअ‍ॅपवर छोट्या कागदपत्रांपासून ते सोशल मीडिया व्हिडिओपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला सहज पाठवता येतं. पण तुम्हाला माहित आहे का की, असे काही व्हिडिओ आहेत जे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यासाठी कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतात. चुकूनही असे व्हिडिओ शेअर करणे टाळा, अन्यथा तुरुंगातील हवा खावी लागू शकते. जाणून घेऊया अशाच काही व्हिडिओंबद्दल.

हे सुद्धा वाचा

गर्भपाताशी संबंधित व्हिडिओ शेअर करू नका

भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. अशावेळी घरबसल्या गर्भपाताचा व्हिडिओ कोणालाही पाठवू नका किंवा गर्भपाताचे घरगुती उपाय सांगणारा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका. गर्भपाताचे औषध घेण्यासंदर्भातील व्हिडिओही शेअर करू नका. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट 1971 नुसार गर्भपात बेकायदेशीर मानला जातो आणि असे करणाऱ्यांना 3 ते 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

आपण प्रमाणित शेअर बाजार तज्ज्ञ नसल्यास, कोणालाही ऑनलाईन शेअर्स खरेदी करण्याचा किंवा इनसाइडर ट्रेडिंगसारख्या बेकायदेशीर कामांमध्ये सामील होण्याचा सल्ला देऊ नका. हे सेबीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते आणि तसे केल्यास आपल्याला दंड किंवा तुरुंगवास देखील होऊ शकतो.

पुष्टीशिवाय फेक न्यूज शेअर करणे गुन्हा

व्हॉट्सअ‍ॅपवर सकाळी लवकर देश आणि समाजाशी संबंधित बातम्या शेअर करणे सामान्य आहे. पण लक्षात ठेवा की कोणत्याही पुष्टीशिवाय फेक न्यूज शेअर करणे हादेखील कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. त्यामुळे कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता नक्की तपासून पाहा. कारण अनेकदा फेक व्हॉट्सअ‍ॅप न्यूज दंगलीचे कारण बनल्याचे दिसून आले आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी

अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवल्यास तुरुंगवास होऊ शकतो. खरं तर भारतात कोर्टाने चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी घातली आहे. असा कोणताही व्हिडिओ आणि फोटो पाठविणे हे गुन्ह्याच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. आम्ही वर दिलेले माहिती तुमच्या कामात येऊ शकते. यामुळे तुमच्याकडून चुकीचे काम टळू शकते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.