तुम्हालाही Call Recording शंका येते? चिंता नको, अशा पध्दतीने पत्ता लावा…
गुगलने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्व कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केले आहेत. तुमच्या फोनमध्ये गुगल डायलर असल्यास, तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे कोणीही तुमचा कॉल रेकॉर्ड करू शकते.
मुंबई : कोणीतरी गुपचूप आपला कॉल रेकॉर्ड (call records) तर करत ना? अशी कधीना कधी प्रत्यकालाच शंका आलेली असते. परंतु अस डायरेक्ट समोरच्या व्यक्तीला कस बरं विचारणार? त्याला राग आला तर? अशी अनेकदा घालमेल होत असते. परंतु आपला कॉल रेकॉर्ड होतोय की नाही याचा पत्ता लावण्यासाठी काही सोप्या टीप्स (Tips) आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही ‘दुध का दुध और पानी का पानी’ करु शकणार आहोत. केवळ या टीप्स बारकाईने बघणे आवश्यक ठरणार आहे. गुगलने (Google) अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्व कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केले आहेत. तुमच्या फोनमध्ये गुगल डायलर असल्यास, तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे कोणीही तुमचा कॉल रेकॉर्ड करू शकते.
सिग्नल्सकडे लक्ष ठेवा
कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, तर तुम्ही काही टिप्स वापरून ते शोधू शकता. म्हणजेच, जर कोणी तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर तुम्हाला असे काही ‘सिग्नल्स’ मिळतील, जे तुम्हाला त्याची माहिती लगेच देतात. बरेच लोक अशा सूचनांकडे लक्ष देत नाहीत.
बीप साउंड ओळखा
अनेक देशांमध्ये एखाद्याच्या नकळत कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर आहे. आणि हेच कारण आहे, की बहुतेक मोबाईल फोन उत्पादक त्यांच्या उपकरणांमध्ये कॉल रेकॉर्डवेळी ‘बीप साउंड’ जोडतात. यामुळे, जेव्हा कोणी कॉल रेकॉर्ड करतो तेव्हा बीप टोन पुन्हा पुन्हा वाजतो. फोनवर कोणाशी बोलत असताना हा आवाज तुम्हाला अनेक वेळा ऐकू आला तर समजा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. असे असले तरी हे सर्व मोबाईल फोनवर लागू असेल असेही नाही.
काही वेळा, युजर्सना एकच बीप आवाज ऐकू येतो. परंतु हे सिग्नल खूप कमी मोबाईलमध्ये दिसून येत असते. पहिल्या युजर्सने कॉल रेकॉर्डिंग सुरू करताच, दुसरा युजर्स एकच मोठा आवाज ऐकतो. हे सूचित करते की कॉल रेकॉर्डिंग सुरु झाली आहे. ही सुविधा बहुतेक फीचर फोनमध्ये आढळते. अलीकडे, गुगलचे रेकॉर्डिंग अॅप्स त्याच्या प्लॅटफॉर्मवर बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत, तुम्हाला गुगल डायलर वापरून स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. ट्रू-कॉलरने कॉल रेकॉर्डिंग फीचर देखील काढून टाकले आहे.