तुमच्याकडे आयफोन आहे का? मग या पाच ट्रिक वापरून बना बेस्ट फोटोग्राफर
तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्हीही बेस्ट फोटोग्राफर बनू शकता. यासाठी आयफोनमधील काही फीचर्स वापरता येणं आवश्यक आहे. त्यामुळे फोटो क्वालिटीसोबत क्लिक चांगले होतात. त्यामुळे बेस्ट फोटोग्राफर असल्याचा फील येतो.
मुंबई : जर तुम्हाला चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आयफोन बेस्ट पर्याय ठरू शकतो. आयफोन महागडा असला तरी त्याची फीचर्सही तितकेच तगडे आहेत.आयफोनचं दर्जेदार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची मांडणी पाहता पहिली निवड ठरू शकते. आयफोनने आतापर्यंत 14 सीरिज लाँच केल्या आहेत. त्याचबरोबर 15 व्या सीरिजची जोरदार तयारी सुरु झाली आहे. असं असलं तरी तुमच्याकडे असलेल्या आयफोनचा तुम्ही योग्य रितीने वापर करू शकता. आयफोनमध्ये बेस्ट कॅमेरा सिस्टम आहे. अनेकदा आपण इतर फोनमध्ये फोटो काढतो पण प्रत्यक्षात त्याची क्वालिटी मात्र तितकी नसते. पण आयफोन हा अपवाद ठरू शकतो. इतकंच काय तर आयफोन वापरून बेस्ट फोटोग्राफी करू शकता. पण आयफोन असूनही तुम्हाला त्यातील पर्याय माहिती नसतील तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. जेणेकरून तु्म्हाला तुमचा फोटोग्राफी सेन्स वाढवता येईल.
पोर्ट्रेट मोड- आयफोनमधील पोर्ट्रेट मोडचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करू शकता. पोर्ट्रेट मोडमध्ये तुम्हाला सहा प्रकारचे लाइट पर्याय मिळतील. यात नॅच्युरल, स्टुडिओ, कोन्टोर, स्टेज, स्टेज मोनो आणि हाय की मोनो असे पर्याय उपलब्ध आहेत. या सहा पर्यायांचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करू शकता.
शूट इन प्रोरॉ- प्रोरॉच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोटो योग्य पद्धतीने एडिट करू शकता.या पर्यायाने तुम्ही एक्सोपजर, कलर आणि व्हाईट बॅलेंस करू शकता. यामुळे तुमचा आयफोन एखाद्या प्रोफेशनल कॅमेरासारखा काम करतो. पण फीचर फक्त आयफोन 12 प्रो आणि त्यानंतरच्या मॉडेल्समध्ये आहे.
लेन्स करेक्शन- फोटो क्लिक करताना तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता. वाइट अँगल लेन्सच्या माध्यमातून फिश आय इफेक्ट घेताना फोटो खराब येऊ शकतो. यासाठी कॅमेरा सेटिंगमध्ये जाऊन लेन्स करेक्शन ऑप्शन वापरू शकता. यामुळे वाईड फोटो घेताना लेन्सचा डिस्टोर्शन होणार नाही.
ग्रिडलीनेस- आयफोनमध्ये कॅमेरा वापरताना हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. ग्रिड ऑप्शनने तुम्ही फ्रेम व्यवस्थितरित्या सेट करू शकता. फोटोतील सबजेक्टदेखील अधोरेखित करू शकता. यासाठी सेंटिंगमध्ये जाऊन कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ग्रिड ऑप्शन तिथे कम्पोजिशनमध्ये हा पर्याय आहे
नाईट मोड- अनेक मोबाईलमधील नाईट मोड हा पर्याय फक्त नावापुरता असतो. काढता स्क्रिनवर बरा दिसतो. पण प्रत्यक्षात फोटो अंधारलेल्या स्थितीत येतात. पण आयफोनचं तसं नाही. तुम्ही आयफोनचा योग्य वापर करून लाईट ऑप्शनचा अंधारात वापर करू शकता. त्यामुळे फोटोही चांगला येतो.