गुगलवर चुकूनही ‘या’ गोष्टी सर्च करू नका, अन्यथा थेट होईल अटक!
इंटरनेट आणि गुगल हे आपल्यासाठी माहितीचे भांडार असले तरी, त्याचा वापर जपून करायला हवा. काही निष्काळजीपणा तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे गुगलवर काय सर्च करावे आणि काय टाळावे, याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. सुरक्षित राहा आणि विचारपूर्वक इंटरनेट वापरा!

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अत्यावश्यक भाग बनलं आहे. कोणतीही शंका असो, माहिती हवी असो, शिक्षण, कामकाज, खरेदी किंवा अगदी आरोग्यविषयक प्रश्न असो – प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण गुगलवर शोधतो. पण गुगलवर शोध घेताना अनेकदा आपण एक गोष्ट विसरतो – गुगल हे ‘फ्री स्पेस’ नाही, तिथे प्रत्येक क्लिक, प्रत्येक शब्द नोंदवला जातो.
तुमचं सर्च काय आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून सर्च करता, किती वेळा करता – हे सर्व गुगलसारख्या सर्च इंजिन्सकडून रेकॉर्ड केलं जातं. आणि हेच डेटाच पुढे सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असतो. विशेषतः जेव्हा एखादा युजर वारंवार किंवा अतिशय संवेदनशील आणि संशयास्पद माहिती सर्च करतो, तेव्हा सायबर क्राईम यंत्रणा अलर्ट होतात.
उदाहरणार्थ, बॉम्ब किंवा शस्त्रास्त्र कसे बनवायचे, ड्रग्स कुठे मिळतात, डार्क वेबवर कसा प्रवेश मिळवायचा किंवा बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट – अशा गोष्टींचा शोध घेतल्यास तो IT Act 2000 नुसार गंभीर गुन्हा ठरतो. आणि यात कोणत्याही प्रकारची मजा किंवा कुतूहल स्वीकारलं जात नाही. सायबर क्राईम सेल यावर सतत लक्ष ठेवून असतो आणि गरज पडल्यास थेट पोलीस कारवाई केली जाऊ शकते.
महाराष्ट्रातल्या काही प्रकरणांमध्ये केवळ ‘शोध घेतला’ म्हणून पोलिसांनी लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये चौकशी झाली, कारण त्या व्यक्तीने वारंवार अशा सर्चेस केल्या होत्या. त्यामुळे ‘गुगलवर काहीही सर्च करा’ ही मोकळीक फारशी सुरक्षित नाही, विशेषतः जर त्या सर्चमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो.
थोडक्यात सांगायचं झालं, तर तुम्ही गुगलवर काय टाईप करता, यावर तुमचं भविष्य ठरू शकतं. म्हणून, पुढच्या वेळी काही ‘हटके’ किंवा ‘गंमत म्हणून’ सर्च करत असाल, तर थोडा विचार करा – कारण गुगलवर टाकलेला एक चुकीचा शब्द तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आणि तिथून सुटका इतकी सोपी नसेल.