Instagram वर आलं नवीन Blend फीचर, युजर्सना मिळणार हा खास फायदा, वाचा सविस्तर
इंस्टाग्रामने 'Blend' नावाचे नवीन फीचर आणले आहे. यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रासोबत मिळून तुमच्या दोघांच्या आवडीनुसार तयार झालेली एक खाजगी रील फीड तुमच्या DM मध्ये तयार करू शकता. चला, जाणून घेऊया हे 'Blend' नक्की कसं काम करतं आणि तुमच्या रील बघण्याच्या अनुभवाला कसं बदलू शकतं!

इंस्टाग्राम हा आता रील्सचा किंग बनला आहे. रोज नवीन रील्स बनवणं, पाहणं आणि मित्रांसोबत शेअर करणं हा आजच्या सोशल मीडिया अनुभवाचा एक भाग बनला आहे. पण आता इंस्टाग्रामने एक नवीन आणि जबरदस्त फीचर आणलं आहे, ज्यामुळे मित्रांसोबत रील्स बघण्याचा अनुभव अजूनच मजेदार होईल. या नवीन फीचरच नाव आहे ‘Blend’!
‘Blend’ फीचर काय आहे?
‘Blend’ फीचर इंस्टाग्रामने आपल्या यूझर्ससाठी आणलं आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या खास मित्रासोबत एक प्रकारची प्रायव्हेट रील फीड तयार करू शकता. या फीडमध्ये तुमच्या दोघांच्याही आवडीच्या रील्स आपोआप दिसतील. इंस्टाग्रामचे प्रमुख, अॅडम मोसेरी यांनी नुकतीच याची घोषणा केली आहे. यामध्ये तुमचे आणि तुमच्या मित्राचे आवडीनिवडी लक्षात घेत रील्स फीड तयार होईल आणि ती फीड सतत अपडेट होईल.




‘Blend’ फीचर कसं वापरायचं?
हे फीचर वापरणं अत्यंत सोपं आहे. तुम्हाला ज्या मित्रासोबत ‘Blend’ तयार करायचं आहे, त्याच्यासोबत तुमच्या DM चॅटमध्ये जा. तिथे तुम्हाला ‘Create Blend’ हा पर्याय दिसेल. ह्या फीचरचा वापर हळूहळू सर्व इंस्टाग्राम यूझर्ससाठी उपलब्ध होईल, त्यामुळे काही वेळ लागू शकतो. एकदा ‘Create Blend’ वर टॅप केल्यावर तुमचं आणि तुमच्या मित्राचं एक प्रायव्हेट रील फीड तयार होईल. तुम्ही ग्रुप चॅटमध्येही हे फीचर वापरू शकता, परंतु त्यासाठी सर्व ग्रुप सदस्यांना ब्लेंडमध्ये सामील होणं गरजेचं आहे.
‘Blend’ फीचरमध्ये काय करता येईल?
तुम्ही आणि तुमचा मित्र एकत्र ब्लेंड फीड तयार केल्यावर, त्या फीडमध्ये दिसणाऱ्या रील्सवर लाइक करू शकता. त्यावर प्रतिक्रिया देऊन गप्पा मारू शकता. जेव्हा तुम्ही किंवा तुमचा मित्र ब्लेंड फीडमध्ये काही प्रतिक्रिया देईल, तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला नोटिफिकेशन मिळेल, ज्यामुळे रील्स पाहताना चर्चाही होईल.
‘Blend’ फीचरचा क्रिएटर्ससाठी फायदे काय ?
‘Blend’ फीचर तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना एकत्र आवडणाऱ्या रील्स शोधण्यास मदत करतो. यामुळे एकमेकांच्या आवडी आणि सवयी अधिक चांगल्या प्रकारे समजून येतात, आणि तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं. रील क्रिएटर्ससाठीही हे फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांच्या रील्सची पोहोच अधिक लोकांपर्यंत होईल.