व्हॉट्सअॅपवरील डिलीट मेसेज वाचण्यासाठी सोपी ट्रिक
मुंबई : व्हॉट्सअॅप सध्या मेसेजिंगमधील सर्वात सोपे माध्यम म्हणून बनले आहे. या अॅपद्वारे युजर्स सहजपणे आपल्या मित्र किंवा कुटुंबीयांसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करु शकतात. आज जगात सर्वात जास्त मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपला पसंती दिली जाते. जेव्हा व्हॉट्सअॅपच्या काही हिडन फीचरची माहिती मिळते, तेव्हा ते वापरण्याचा आनंद खूप वाढतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार […]

मुंबई : व्हॉट्सअॅप सध्या मेसेजिंगमधील सर्वात सोपे माध्यम म्हणून बनले आहे. या अॅपद्वारे युजर्स सहजपणे आपल्या मित्र किंवा कुटुंबीयांसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करु शकतात. आज जगात सर्वात जास्त मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपला पसंती दिली जाते. जेव्हा व्हॉट्सअॅपच्या काही हिडन फीचरची माहिती मिळते, तेव्हा ते वापरण्याचा आनंद खूप वाढतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत की, ज्याद्वारे आपण डिलीट केलेले मेसेज वाचू शकता.
जर आपल्याला व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज वाचायचे असतील तर सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुमचा स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड किटकॅट व्हर्जनचा अपडेटेड व्हर्जन असावा.
व्हॉट्सअॅपवर डिलीट झालेले मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ‘नोटीफिकेशन हिस्ट्री’ अॅप डाऊनलोड करावा लागेल. डाऊनलोड झाल्यावर या अॅपमध्ये नोटिफिकेशन आणि अॅडमिनिस्ट्रेटर अॅक्सेसला ऑन करा.
डाऊनलोड आणि इंस्टॉल झाल्यावर हे अॅप तुमची नोटिफिकेशन हिस्ट्री रेकॉर्ड करायला सुरुवात करेल. थोड्या वेळाने हे अॅप ओपन करा आणि व्हॉट्सअॅप आयकॉनवर क्लिक करा.
नोटिफिकेशन हिस्ट्री अॅपवर व्हॉट्सअॅप आयकॉन सुरु केल्यानंतर ज्या नंबरचे डिलीट मेसेज वाचायचे आहे, तो नंबर निवडा. नंबर निवडल्यावर तुम्ही डिलीट केलेले मेसेज वाचू शकता.
या अॅपच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर डिलीट झालेले मेसेज वाचू शकता. मात्र या अॅपची काही मर्यादा आहे. हे अॅप कोणत्याही मेसेजच्या सुरुवातीचे 100 शब्द फक्त रेकॉर्ड करु शकतो आणि फोन री-स्टार्ट केल्यावर या अॅपमध्ये रेकॉर्ड केलेले सर्व मेसेज डिलीट होतात.
VIDEO : व्हॉट्सअॅपवरील डिलिटेड मेसेज कसे वाचाल?