एसीचा वापर करताना घ्या ही काळजी; वीजबिल येईल खूपच कमी
सोप्या टिप्सचा वापर करून, तुम्ही तुमच्या एसीच्या वापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकता आणि विजेचं बिल कमी करू शकता.

उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे लोक पंखा, कुलर आणि एसीचा सतत वापर करतात. त्यात, एसी आजकाल अनेक घरांमध्ये सहज उपलब्ध असतात. परंतु, एसी वापरल्यामुळे एक मोठा अडचणीचा मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे विजेचंं बिल जास्त जास्त येते. म्हणून एसी वापरताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचं मन आणि पाकीट दोन्ही कुल-कुल राहतील.
1. एसी खरेदी करताना नेहमी 5 स्टार रेटिंग असलेला एसी घ्या. कारण तो कमी विजेचा वापर करतो. यामुळे तुमचं विजेचं बिल कमी येण्यास मदत होते.
2. तुम्ही ज्यावेळी एसी चालू करता, तेव्हा पंखा देखील सोबत चालू ठेवा. एसी एकटा रूम थंड करण्यास वेळ घेतो. पण एसीसोबत पंखा चालू असल्यास, रुम लवकर थंड होते यामुळे एसीचे काम वाचेल आणि विजेचा वापर कमी होईल.
3. अनेक लोक रात्री झोपताना एसी चालू ठेवतात. पण यामुळे एसी जास्त वेळ चालू राहतो आणि विजेचा वापर अधीक होतो. तुम्ही झोपण्यापूर्वी एसीचा टाइमर सेट केला, तर एसी आपोआप बंद होईल आणि वीज कमी वापरली जाईल
4. एसीची वेळोवेळी साफसफाई आणि सर्विस करणे आवश्यक आहे. यामुळे एसी चांगल्या प्रकारे काम करतो .नियमित साफसफाई न केल्यास एसी जास्त विजेचा वापर करतो आणि लवकर खराब होऊ शकतो.
एसी विकत घेताना काय काळजी घ्यावी?
1. रेटिंग आणि ऊर्जा बचत
एसी खरेदी करताना त्याचे ऊर्जा बचत रेटिंग (Star Rating) तपासा. फाइव्ह स्टार रेटिंग असलेला एसी जास्त ऊर्जा बचत करतो, आणि विजेचा वापर कमी होतो. त्यामुळे, विजेचा बिल कमी ठेवण्यासाठी उच्च रेटिंग असलेला एसी निवडा.
2. स्ट्रोक आणि क्षमता (Capacity)
एसीचा स्ट्रोक आणि क्षमता तुमच्या रूमच्या आकारानुसार असावा. लहान रूमसाठी १ टन किंवा १.५ टन क्षमता असलेला एसी पुरेसा असतो. मोठ्या रूमसाठी अधिक क्षमतेचा एसी घ्या. योग्य क्षमता नसल्यास, एसी अधिक ऊर्जा वापरण्याचा धोका असतो.
3. ब्रँड आणि विश्वसनीयता
एसी घेताना प्रसिद्ध आणि विश्वासार्ह ब्रँड निवडा. त्या ब्रँडचा सर्व्हिस नेटवर्क आणि इन्शुरन्स देखील तपासा. विश्वसनीय ब्रँडच्या एसीला जास्त कालावधीपर्यंत कार्यक्षमता मिळते आणि त्याची सेवा देखील चांगली असते.
4. एसीचा आवाज
एसी चालू असताना आवाज जास्त होत नाही याची खात्री करा. आवाज कमी असलेला एसी निवडा, कारण जास्त आवाजाने तुमच्या आरामात विघ्न येऊ शकते.
5. तापमान आणि हवेची गती
एसीमध्ये तापमान सेट करण्याची सोय आणि हवा फेकण्याची गती देखील महत्त्वाची आहे. काही एसीमध्ये ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण असते, जे ऊर्जा बचत करण्यास मदत करते. हवा योग्य प्रमाणात पसरवणारा एसी निवडा.
वॉरंटी आणि सर्विस
एसी घेताना त्यावर वॉरंटी मिळते का हे तपासा. तसेच, सर्विस सेंटर्सची उपलब्धता आणि त्या ब्रँडच्या सर्विसचा अनुभव देखील महत्वाचा आहे.