Electric Heater vs Oil Heater कोणते बेस्ट, फायदे-तोटे जाणून घ्या

नॉर्मल हीटर आणि ऑइल हीटर या दोन्हींची योग्य माहिती तुम्हाला आहे का? हीटर खरेदी केल्यानंतर बहुतांश लोकांना खोलीसाठी चुकीचा हीटर विकत घेतल्याचा पश्चाताप होत असतो, त्यामुळे तुम्हाला नॉर्मल हीटर आणि ऑइल हीटर या दोन्हींची योग्य माहिती असायला हवी. याची माहिती जाणून घ्या.

Electric Heater vs Oil Heater कोणते बेस्ट, फायदे-तोटे जाणून घ्या
Electric Heater vs Oil Heater
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 3:34 PM

तुम्हाला हीटर घ्यायचे असेल तर ही बातमी वाचा. इलेक्ट्रिक हीटर आणि ऑईल हीटर हे दोन्ही पर्याय बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. हिवाळ्यात लोक खोलीसाठी हीटर खरेदी करतात. इलेक्ट्रिक हीटर आणि ऑईल हीटर हे दोन्ही पर्याय तुम्हाला बाजारात मिळतील. याची माहिती जाणून घ्या. हीटर खरेदी करताना कोणता हीटर आपल्यासाठी योग्य आहे आणि कोणता नाही हे जर तुम्हाला माहित नसेल तर हीटर विकत घेतल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. इलेक्ट्रिक हीटर आणि ऑईल हीटर या दोन्हींचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. कोणता हीटर आपल्यासाठी योग्य ठरेल आणि खरेदी करण्यात काय नुकसान आहे, हे समजून घ्या.

इलेक्ट्रिक हीटर

इलेक्ट्रिक हीटर खूप लवकर गरम होतात. यामुळे खोली लवकर गरम होते. याव्यतिरिक्त नॉर्मल हीटर ऑईल हीटरपेक्षा स्वस्त असतात. इलेक्ट्रिक हीटरचा आकार लहान असून हे हीटर हलके असतात, जे सहज पणे इकडे तिकडे हलवता येतात.

तोट्यांबद्दल बोलायचे झाले तर इलेक्ट्रिक हीटर जास्त वीज वापरते. चला तर मग जाणून घेऊया हे हीटर कसे काम करते?

या प्रकारच्या हीटरमध्ये ब्लोअर आणि स्प्रिंगचा वापर केला जातो, जे गरम होऊन गरम हवा देतात. नॉर्मल हीटरमुळे त्वचा कोरडी पडू लागते, ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.

ऑईल हीटरचे फायदे

ऑईल हीटर तेलाच्या प्रक्रियेने चालते. यामध्ये करंटद्वारे तेल गरम होऊ लागते. या प्रकारचा हीटर हळूहळू गरम होतो पण खोली बराच काळ उबदार राहते. या हीटरमुळे हवा कोरडी होत नाही. यामुळे त्वचेची समस्या उद्भवत नाही.

तोट्यांबद्दल बोलायचे झाले तर ऑईल हीटर खरेदी करण्यासाठी सामान्य हीटरपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. आपल्यासाठी कोणता हीटर चांगला आहे हे आपल्या घराच्या आकार, बजेट आणि गरजा यावर अवलंबून असते.

सुरक्षिततेसाठी काय करावं?

सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स म्हणजे, कोणत्याही प्रकारचे हीटर वापरताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सहज जळणाऱ्या वस्तूंजवळ हीटर कधीही ठेवू नका. झोपताना हीटर बंद करा. मुलांना हीटरपासून दूर ठेवा.

हीटर विकत घेतल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. इलेक्ट्रिक हीटर आणि ऑईल हीटर या दोन्हींचे काही फायदे आणि काही तोटे आम्ही वर सांगितले आहेत. कोणता हीटर आपल्यासाठी योग्य ठरेल आणि खरेदी करण्यात काय नुकसान आहे, हे वरील माहितीवरुन तुम्हाला कळेल आणि योग्य हीटर तुम्ही घरी आणू शकाल.

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.