Elon Musk आता काय म्हणावे; पुरविणार अंबट शौकिनांचे चोचले
Elon Musk X : सोशल मीडियावर प्रौढांसाठीचा कंटेंट सहज पुढ्यात येतो. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर या अश्लिल कंटेंटचा सध्या मारा दिसतो. त्याविरोधात रिपोर्ट केल्यावर तो काढण्यात येतो. लवकरच असा कंटेंट एलॉन मस्क याच्या एक्स या मायक्रो ब्लॉगिंगवर दिसून येईल. येत्या काळात लेबलसह हा कंटेंट अंबट शौकिनांचे डोळे दिपवणार आहे.

सोशल मीडियावरील मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X मध्ये कायम प्रयोग सुरु असतात. या प्लॅटफॉर्मचे नाव, लोगो इतकेच काय कर्मचारी, कार्यालय सगळं-सगळं काही एका त्सुनामीत बदलून गेलं. अर्थात एलॉन मस्क नावाची ही त्सुनामी आहे. या मायक्रो ब्लॉगिंगला या प्रयोगाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. उत्पन्नाचे झरे आटले आहेत. अनेक जुन्या साथीदारांनी हात वर केले आहेत. तर जाहिरातदारांनी चार हात दूर केले आहेत. त्यामुळे एलॉन मस्क याने एक हुकमी कार्ड फेकले आहे. प्रौढांसाठी असलेला कंटेंट आता लेबलसहित एक्सवर दिसेल. गवसले कामाचे सूत्र अर्थात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंबट शौकिनांसाठीच्या कंटेंटची कमतरता नाही. ते अचानक पुढ्यात येत असल्याने...