प्रत्येक ब्रँडची कॉपी करणाऱ्या चीनमध्ये Elon Musk चा ड्युप्लिकेट, एडिटेड की कार्बन कॉपी?

अनेक वेळा प्रसिद्ध व्यक्तींसारखे दिसणारे लोक इंटरनेटवर पाहायला मिळतात. सेलिब्रेटींचे Look-alike नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होत असतात. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एलॉन मस्कसारखी दिसणारी चिनी व्यक्ती पाहायला मिळाली आहे.

प्रत्येक ब्रँडची कॉपी करणाऱ्या चीनमध्ये Elon Musk चा ड्युप्लिकेट, एडिटेड की कार्बन कॉपी?
Elon Musk
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 9:54 PM

मुंबई : अनेक वेळा प्रसिद्ध व्यक्तींसारखे दिसणारे लोक इंटरनेटवर पाहायला मिळतात. सेलिब्रेटींचे Look-alike नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होत असतात. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एलॉन मस्कसारखी दिसणारी चिनी व्यक्ती पाहायला मिळाली आहे. टेस्लाच्या प्रमुखासारखा दिसणारा चिनी व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Elon Musk’s Clone? Viral Video Shows deepfake image of Tesla CEO)

हा व्हिडीओ सर्वात आधी टिकटॉकचं चीनी व्हर्जन असलेल्या Douyin वर पोस्ट करण्यात आला होता. यानंतर हा व्हिडीओ आता इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडीओमध्ये एलॉन मस्कसारखा दिसणारा एक चिनी व्यक्ती काळ्या रंगाच्या कारजवळ उभा आहे. तो कॅमेराकडे पाहत आहे.

ही व्हिडीओ क्लिप पाहून लोकांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी या व्यक्तीचे नाव Yi Long Musk ठेवले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लोक प्रश्नही उपस्थित करत आहेत. बरेच नेटकरी असे गृहीत धरत आहेत की ते डीपफेक (Deepfake) असू शकते.

डीपफेक (Deepfake) हे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे AI वापरून युजरचा एडिटेडेड व्हिडीओ बनवला जाऊ शकतो. हे इतके काळजीपूर्वक केले जाते की व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती खरी वाटते आणि त्यामुळे डीपफेक व्हिडीओ आणि अस्सल व्हिडीओ ओळखणे कठीण आहे.

डीपफेक असल्याचा दावा

एका फेसबुक युजरने हा व्हिडीओ डीपफेक असल्याचा दावा केला आहे. याचे कारणही त्यांने सांगितले आहे. या युजरने सांगितले आहे की, जेव्हा कॅमेरा त्याच्या दिशेने सरकतो, तेव्हा बोलण्याच्या वेळी गडबड दिसते, डोळे आणि तोंड यांच्या अॅक्शनमध्ये विलंब (डीले) होतोय.

मस्कची कार्बन कॉपी?

अनेक फेसबुक युजर्सनी या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे. तर काही युजर्स याला मस्कची कार्बन कॉपी देखील म्हणत आहेत. या वर्षी मार्चमध्ये टॉम क्रूझचे अनेक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तो इतका खरा दिसत होता की व्हिडीओमध्ये दिसणारा खरा हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ तिथे नाही यावर कोट्यवधी लोकांचा विश्वास बसत नव्हता.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Elon Musk’s Clone? Viral Video Shows deepfake image of Tesla CEO)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.