AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer | EVM विरोधकांच्या निशाण्यावर; खरंच होते का हॅक मतदान यंत्र

EVM Hack | राहुल गांधी म्हणाले EVM मध्ये गडबड आहे. मग खरंच मतदान यंत्र हॅक होऊ शकते का? याविषयीची माहिती प्रत्येकाला हवी आहे. ईव्हीएम मशीन आहे तरी काय? ती कसं काम करते. ईव्हीएम मशीन खरंच हॅक करता येते का, असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात घोळत असतात, काय आहे त्याचे उत्तर?

Explainer | EVM विरोधकांच्या निशाण्यावर; खरंच होते का हॅक मतदान यंत्र
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 2:50 PM

नवी दिल्ली | 15 March 2024 : देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची जोरदार तयारी सुरु आहे. अवघ्या काही तासातच निवडणुकीची तारीख पण समोर येईल. जेव्हा निवडणुकीचे पडघम वाजतात. तेव्हा देशात सध्या काही वर्षांपासून EVM ची चर्चा रंगते रंगतेच. विरोधक सरकारवर ईव्हीएमच्या गडबडीचा आरोप करतात. राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधकांचा हाच आरोप आहे. तर अनेक पक्षांनी देशात पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. याविषयी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिका अनेकदा फेटाळण्यात आल्या. आता ही याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पण खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकते? काय आहे या प्रश्नाचं उत्तर..शंकेला खरंच आहे का जागा?

EVM मध्ये गडबड

इंडिया आघाडीचा चेहरा राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते ईव्हीएममध्ये गडबडी असल्याचा आरोप करत आहे. सरकारवर पण ते निशाणा साधताना दिसून येत आहे. त्यांचे मते ईव्हीएमचे निकाल अत्यंत निराशाजनक आहे. या माध्यमातून मतदान घोटाळा होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोपच त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

EVM चे पूर्ण नाव तरी काय

वर्ष 1982 मध्ये निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने पहिल्यांदा EVM चा वापर केला होता. आता बॅलेट पेपरऐवजी EVM चा वापर करण्यात येत आहे. EVM चे पूर्ण नाव इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच मतदान केंद्रावरील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आणण्यात आली होती.

कसे काम करते EVM

ईव्हीएम मतदान यंत्र, मतदानासह मतं जमा करते. ज्या दिवशी मतदान मोजणी असते. त्यादिवशी निवडणूक आयोग EVM मशीनमधील मतदानाची मोजणी करते. ज्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात. त्या उमेदवाराला मत मोजणी प्रक्रियेनंतर विजयी घोषीत करण्यात येते.

EVM मध्ये दोन युनिट असतात. यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट यांचा समावेश असतो. हे दोन्ही युनिट एक पाच मीटरच्या केबलने जोडले जातात.

  • Control Unit (CU): कंट्रोल युनिट पीठासीन अधिकारी, रिटर्निंग ऑफिसरकडे (RO) असतात.
  • Balloting Unit (BU): बॅलेटिंग युनिट हे वोटिंग कंम्पार्टमेंटमध्ये ठेवण्यात येते. तुमचे मत याच विभागात जमा होते. मतदान केंद्रावरील अधिकारी मतदाराची ओळख पटवतात. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील बॅलेट बटन त्याला दाबावे लागते. मतदार बॅलेटिंग युनिटवर देण्यात आलेला उमेदवार, त्याचे निवडणूक चिन्ह यासमोरील निळे बटण दाबून मतदान करतो.

EVM आणि VVPAT

विरोधकांच्या सततच्या हल्ल्यानंतर अनेक निवडणुकीत आता EVMसोबत वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) पण जोडण्यात येते. यामध्ये एक स्लिप बाहेर येते. या स्लिपमध्ये ज्या उमेदवाराला मतदान केले. त्याचे छायाचित्र आणि निवडणूक चिन्ह दिसते. त्यामुळे मतदान करणाऱ्याला त्याने मतदान त्याच्याच उमेदवाराला केले की नाही, याची खात्री पटते.

EVM होते का हॅक

  • विरोधकांनी या मुद्दावरुन सरकारला अनेकदा घेरले आहे. जनतेच्या मनात पण याविषयी शंका आहे. निवडणूक आयोगाच्या मते, ईव्हीएम मशीन कम्प्युटरद्वारे नियंत्रीत नसते. ही एक स्टँड अलोन मशीन आहे. हे यंत्र इंटरनेट अथवा इतर कोणत्याही नेटवर्कसोबत कनेक्ट नसते. त्यामुळे हे यंत्र हॅक होते, हे म्हणणे हास्यास्पद आहे. हे मशीन हॅक करता येत नाही.
  • माहितीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की, ईव्हीएममध्ये डेटासाठी फ्रिक्वेन्सी रिसीव्हर वा डिकोडर नसते. हे कोणत्याही वायरलेस डिव्हाईस, वाय-फाय वा ब्लूटूथसारख्या यंत्राने हॅक करणे, छेडछाड करणे सोपे नाही.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.