Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Facebook Name Change : फेसबुकने नाव बदललं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ‘मेटा’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून 'मेटा' केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे.

Facebook Name Change :  फेसबुकने नाव बदललं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता 'मेटा'
फेसबुक कंपनीने आपलं नाव बदलून मेटा केलं आहे.
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 7:14 AM

Facebook Name Change : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे. पण असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत.

कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

2005 ला ही कंपनीने नाव बदललं होतं

फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते, जेव्हा त्याने आपले नाव TheFacebook वरून Facebook असे बदलले होते. जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे.

फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स, नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशा मार्केटमध्ये आशा आहेत.

कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे. मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.

ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये कंपनीवर प्रश्न उपस्थित होत असताना, प्रक्षोभक मजकूर थांबत नसताना फेसबुकने हे नाव बदलले आहे. भारत सरकारने फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया कंपनीद्वारे वापरल्या जाणार्‍या अल्गोरिदम आणि प्रक्रियांचा तपशील मागवला आहे.

(Facebook announces changing company name to meta)

हे ही वाचा :

33W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी, POCO चा नवा 5G फोन दिवाळीनंतर बाजारात

OPPO चा किफायतशीर 5G स्मार्टफोन सादर, जाणून घ्या नव्या फोनमध्ये काय आहे खास?

आता JioPhone बद्दल सुंदर पिचाईंचा मोठा खुलासा, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन लवकरच लॉन्च होणार

सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.