Facebook चा आयफोन युजर्सना झटका; गायब झाले ‘हे’ फीचर

आयफोनमध्ये फेसबूक डार्क मोडवर चालवणे कठीण झाले आहे. ज्या आयफोन युजर्सनी फेसबूकचे iOS ॲप अपडेट केले आहे, त्यांच्या फोनमध्ये डार्क मोड बंद झाला आहे. डार्क मोड ऑन केल्यानंतरही ब्राईट मोड सुरु राहतो.

Facebook चा आयफोन युजर्सना झटका; गायब झाले 'हे' फीचर
iPhone 13 OfferImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 3:32 PM

जगभरातील आयफोन युजर्सना (iPhone users) सध्या एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आयफोनमध्ये फेसबूक (Facebook) या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईटवरील डार्क मोड बंद झाला आहे. हजारो युजर्सनी सोशल मीडियावर , फेसबूकच्या डार्क मोड फीचर (dark mode feature) संदर्भातील समस्येबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. फेसबूकच्या डार्क मोडचे काम अचानक बंद झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, ही समस्या त्या आयफोन युजर्सना सहन करावी लागत आहे, ज्यांनी फेसबूकचे iOS ॲप 379.0 व्हर्जन अपडेट (updated version)केले आहे. हे लेटेस्ट व्हर्जन काही क्रॅश दुरुस्त करण्यासाठी आणि जलद रित्या फीचर लोड करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. मात्र या नव्या अपडेटमुळे आयफोन युजर्सना फेसबूक वापरताना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

डार्क मोड फीचर कधी होणार दुरूस्त ?

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबूकच्या डार्क मोड फीचरचा प्रॉब्लेम नक्की कधी दुरस्त होईल, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तर फेसबूकने या प्रॉब्लेमबद्दल कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. त्यामुळे आयफोन युजर्सना अजून काही काळ तरी ही समस्या सहन करावी लागेल, असेच चित्र दिसते.

काय आहे डार्क मोड ऑन करण्याची पद्धत ?

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा आयफोन युजर्स फेसबूक डार्क मोडमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतात, ते (फेसबूक) ॲप लगेचच ब्राइट मोडवर सुरू होते. फेसबूक डार्क मोड कसा ऑन करावा, हे जाणून घेऊया…

1) तुमच्या आयफोनमध्ये खालच्या बाजूस जाऊन सेटिंग्जवर क्लिक करावे. त्यानंतर प्रायव्हसी या ऑप्शनवर जावे.

2) त्यानंतर सेटिंग्जचा पर्याय निवडावा आणि खाली जाऊन फेसबूकवर क्लिक करावे,

3) त्यामध्ये ‘Dark Mode’स्विच ऑन करावा. यानंतर हा मोड ऑन होईल.

बॅकग्राऊंडवरून ठरेल मोड

वर सांगितलेल्या स्टेप्स व्यतिरिक्त तुम्ही इतर मार्गांनीही डार्क मोड ऑन सेट करु शकता. त्यासाठी तुम्हाला सिस्टम ऑप्शन निवडावा लागेल. असे केल्यानंतर बँकग्राऊंड सेटिंगच्या नुसार फेसबुक ॲप आपोआप डार्क मोड किंवा लाइट मोडवर जाईल. त्यानंतरही डार्क मोड वापरण्यात अडचणी येत असल्यास फेसबूक ॲप अनइनस्टॉल करावे व परत इनस्टॉल करावे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.