Facebook कडून तालिबानशी संबंधित कंटेंट हटवण्यास सुरुवात, वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

फेसबुक इंकच्या एक्झिक्युटिव्हने सांगितले की, कंपनी तालिबानला प्रमोट करणारा कंटेंट आमच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत आहे.

Facebook कडून तालिबानशी संबंधित कंटेंट हटवण्यास सुरुवात, वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती
Facebook
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 4:58 PM

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर फेसबुक तालिबानला प्रोत्साहन देणारी सामग्री आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवत आहे. फेसबुक इंकच्या एक्झिक्युटिव्हने सांगितले की, कंपनी तालिबानला प्रमोट करणारा कंटेंट आमच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत आहे. (Facebook executive says their company actively removing Taliban content from platform)

फेसबुकच्या फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी सोमवारी ब्लूमबर्ग टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान सांगितले की, तालिबान कंपनीच्या धोकादायक संघटनांच्या यादीत आहेत आणि त्यामुळे या समूहाचा प्रचार किंवा प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व प्रकारच्या सामग्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

मोसेरी म्हणाले की, “आम्ही अशा धोरणावर अवलंबून आहोत, जे आम्हाला तालिबानशी संबंधित धोकादायक किंवा अगदी संबंधित कोणतीही गोष्ट सक्रियपणे काढून टाकण्यास सक्षम करेल.” ते पुढे म्हणाले की, आता ही परिस्थिती झपाट्याने वाढत आहे, आणि यासोबत मला खात्री आहे की धोका देखील वाढेल. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, आपण काय करतो ते मॉडिफाय करावे लागेल आणि या वाढत्या अडचणींना आपण कसा प्रतिसाद देतो किंवा आपण त्याचा कसा सामना करतो ते पाहावे.

तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलची राजधानी काबीज केल्यावर हजारो लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने सोमवारी सांगितले की ते विमानतळ सुरक्षित करण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांना तसेच स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी पावले उचलत आहे. अमेरिका समर्थित राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले आहेत. तालिबानने सांगितले की, त्यांनी आता राष्ट्रपतींचा महाल ताब्यात घेतला आहे. आता ते ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगान’ची घोषणा करणार आहेत.

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं.

120 भारतीय परतले

भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

इतर बातम्या

Taliban Crisis : काबूलमधील परिस्थितीनंतर भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा, जाणून घ्या याबाबत

Afghanistan Crisis: ज्या विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली, विमानात काय स्थिती होती? व्हायरल फोटो पाहिले का?

(Facebook executive says their company actively removing Taliban content from platform)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.