एकाच आठवड्यात फेसबुक, इंस्टाग्राम दुसऱ्यांदा डाऊन, कंपनीकडून दिलगिरी
सोशल मीडिया अॅप्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाले आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. रात्री 12 नंतर सुमारे एक तास दोन्ही अॅप्सवर परिणाम झाला.
मुंबई : सोशल मीडिया अॅप्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाले आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. रात्री 12 नंतर सुमारे एक तास दोन्ही अॅप्सवर परिणाम झाला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम काही काळ बंद होते. मात्र, आता ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. यापूर्वी रविवार-सोमवारी (3 ते 4 ऑक्टोबर दरम्यान) इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचे सर्व्हरही सुमारे सहा तास बंद होते.
फेसबुककडून दिलगिरी
यासंदर्भात दोन्ही अॅप्सने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये ज्या युजर्सना या समस्येला सामोरे जावे लागले त्यांची माफी मागितली आहे. फेसबुकने ट्विट केले, “काही लोकांना अॅप्स आणि वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही आमच्यावर किती अवलंबून आहात हे आम्हाला माहिती आहे. आता आम्ही समस्या सोडवली आहे. यावेळीही तुम्ही संयम राखल्याबद्दल धन्यवाद.”
We’re so sorry if you weren’t able to access our products during the last couple of hours. We know how much you depend on us to communicate with one another. We fixed the issue — thanks again for your patience this week.
— Facebook (@Facebook) October 8, 2021
इन्स्टाग्रामने मागीतली यूजर्सची माफी
तर दुसरीकडे इन्स्टाग्रामने देखील आपल्या यूजर्सची माफी मागीतली आहे. इन्स्टाग्रामने टिट्वरवर यासंबधी एक टिट्व शेअर केले आहे. तुमच्यापैकी काहींना आत्ता इन्स्टाग्राम वापरताना काही समस्या येत असतील. तर त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत.आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.”
We know some of you may be having some issues using Instagram right now (?). We’re so sorry and are working as quickly as possible to fix.
— Instagram Comms (@InstagramComms) October 8, 2021
आठवड्यात दुसऱ्यांदा सर्व्हर डाऊन
इंटरनेट मॉनिटरिंग वेबसाइट डाऊन डिटेक्टरनुसार, व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक फेसबुक आणि इन्स्टाग्राम सोमवारी रात्री अचानक बंद झाले. 9 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12:12 वाजता एकूण 28,702 फाईल क्रॅश झाल्याची नोंद झाली. जगभरातील लाखो वापरकर्त्यांना सोशल मीडीया डाऊन झाल्यामुळे खूप त्रास झाला. व्हॉट्सअॅप यूजर्स संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे, फेसबुक यूजर्सना फक्त जून्या पोस्ट दिसत होत्या. तर दुसरीकडे, इंस्टाग्राम यूजर्सना देखील स्टोरी आणि रीलमध्ये पाहण्यास समस्या येत होती.
इतर बातम्या :
जपानी लोक क्षणात आळस आणि सुस्ती दूर करतात, काय आहे जपानी ट्रिक?; वाचा
‘या’ चार सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला!