कोरोनाविषयीच्या ‘फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून मोठा निर्णय

कोरोनाविषयीच्या अनेक खोट्या बातम्या किंवा इतर स्वरुपातील माहिती फॉरवर्ड होण्याचं प्रमाण वाढलं. याचं गांभीर्य लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने यासाठी मोठा निर्णय घेतला आहे (WhatsApp on Corona Fake News).

कोरोनाविषयीच्या 'फेक न्यूज'ला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 4:17 PM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात काही ठिकाणी पूर्णतः तर काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यावधी नागरिक घरात बंद आहेत. अशावेळी व्हॉट्सअॅपवरील फेक न्यूजचंही प्रमाण वाढत असल्याचं समोर येत आहे. कोरोनाविषयीच्या अनेक खोट्या बातम्या किंवा इतर स्वरुपातील माहिती फॉरवर्ड होण्याचं प्रमाण वाढलं. याचं गांभीर्य लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने यासाठी मोठा निर्णय घेतला आहे (WhatsApp on Corona Fake News). यानुसार यापुढे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना एक मेसेज केवळ एकदाच फॉरवर्ड करता येणार आहे. याआधी चुकीच्या माहितीच्या मेसेजवर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने केवळ 5 वेळा फॉरवर्डचा नियम केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता फॉरवर्ड मर्यादा केवळ एकवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्हॉट्सअॅपवर कोणतीही माहिती व्हायरल होण्यासाठी फार वेळ लागत नाही. यामुळे जशी खरी आणि उपयोगी माहिती नागरिकांपर्यंत पोहचते, तशीच खोटी आणि चुकीची माहिती देखील पोहचते. यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. काहीवेळा अशा माहितीमुळे हिंसा आणि दंगली झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या आणि खोट्या माहितीने नवे प्रश्न तयार होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅपकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी वैज्ञानिकांकडून पूर्ण प्रयत्न होत असतानाच व्हॉट्सअॅपवर अनेक चुकीची औषधे आणि आजार बऱ्या करण्याच्या अवैज्ञानिक गोष्टींचा प्रसार होत आहे. जगभरात अशा चुकीच्या औषध आणि पद्धतींमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप माहितीच्या तपासणी आणि सत्यतेवर देखील काम करत आहे. लवकरच ते फिचरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आपल्यापर्यंत पोहचलेली माहिती खरी आहे की खोटी हे समजू शकणार आहे. सध्या तरी वापरकर्त्यांना मेसेज फॉरवर्ड करताना मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. यामुळे मेसेज फॉरवर्डमध्ये जवळपास 25 टक्क्यांची घट होईल, असा अंदाज व्हॉट्सअॅपकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Corona | राज्यात 26 नव्या रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या जवळ

संचारबंदी शिथील करताच बाजारपेठात तुफान गर्दी, चंद्रपुरात 12 तासात निर्णय मागे

‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य, आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

मुंबईत कोरोनाचा विळखा वाढला, आणखी एका खासगी रुग्णालयातील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

WhatsApp restriction on Forward messages amid Corona Fake News

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.