Facebook चं नाव बदलणार, कंपनीचं मोठं पाऊल, जाणून घ्या कारण

| Updated on: Oct 20, 2021 | 12:44 PM

Facebook to change its name : सोशल मीडिया कंपनी फेसबुक इंक (Facebook Inc) पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याची योजना आखत आहे.

Facebook चं नाव बदलणार, कंपनीचं मोठं पाऊल, जाणून घ्या कारण
Facebook
Follow us on

Facebook to change its name : सोशल मीडिया कंपनी फेसबुक इंक (Facebook Inc) पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याची योजना आखत आहे. The Verge मधील एका रिपोर्टनुसार, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यावर चर्चा करू शकतात. तथापि, अहवालात असे म्हटले गेले आहे की रिब्रँडिंगबद्दलच्या बातम्या यापेक्षा लवकर येऊ शकतात. (Facebook Plans To Change Its Name; says Report)

फेसबुक अॅपच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही

फेसबुकच्या मूळ अॅप आणि सेवेच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. हे एका मूळ कंपनीच्या अंतर्गत ठेवण्यात येईल ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये लाखो युजर्ससह इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या इतर ब्रँडचा समावेश असेल. Google ने Alphabet Inc. ची मूळ कंपनी बनवून अशीच रचना ठेवली आहे. रीब्रँडिंगनंतर, फेसबुकचे सोशल मीडिया अॅप हे मूळ कंपनीच्या अंतर्गत उत्पादन असेल. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, Oculus इत्यादी इतर प्लॅटफॉर्म देखील या मूळ कंपनीमध्येच येतील.

झुकेरबर्गने 2004 मध्ये या सोशल नेटवर्कची सुरुवात केली होती. त्याने म्हटले आहे की फेसबुकच्या भविष्यासाठी मेटावर्स कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे. ही एक कल्पना आहे, ज्यामध्ये युजर्स व्हर्च्युअल जगात राहतील, काम करतील आणि व्यायाम करतील. कंपनीची Oculus व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट आणि सेवा त्याचं व्हिजन पूर्ण करण्याचा महत्त्वाचा भाग आहे.

मेटावर्स कंपनी म्हणून ओळख बनवण्याचा उद्देश

झुकरबर्गने जुलैमध्ये सांगितले की, येत्या काही वर्षांमध्ये, लोकांनी त्यांच्या मुख्यत्वे सोशल मीडिया कंपनीऐवजी मेटावर्स कंपनी म्हणून पाहण्याची अपेक्षा केली आहे. तो म्हणाला की, मेटावर्स सोशल टेक्नोलॉजीचं खरं एक्सप्रेशन आहे.

ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा कंपनीला अमेरिकन सरकारकडून त्याच्या व्यावसायिक क्रियाकलापांवर वाढत्या पाळत ठेवण्याचा सामना करावा लागत आहे. तिथल्या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी कंपनीवर टीका केली आहे, ज्यामुळे फेसबुकबद्दल काँग्रेसमध्ये वाढता राग दिसून येतोय. सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी नावे बदलणे असामान्य नाही. गुगलने 2015 मध्ये होल्डिंग कंपनी म्हणून अल्फाबेट इंकची सुरुवात केली. यासह, सर्च आणि जाहिरात व्यवसायाच्या पलीकडे विस्तार करणे हेच त्यांचे ध्येय होते.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं

(Facebook Plans To Change Its Name; says Report)