Phhhoto अ‍ॅपचा मेटाविरोधात खटला, खास फीचरची कॉपी केल्याचा आरोप

एका फोटो अ‍ॅपने फेसबुकवर आरोप केला आहे की फेसबुकने त्यांचे फीचर्स इन्स्टाग्रामसाठी कॉपी केले आहेत. Instagram कंपीटीटरने मेटाविरोधात (पूर्वी फेसबुक म्हणून ओळखले जाणारे) त्यांच्या फीचरचे क्लोनिंग आणि कॉम्पिटिशनची मोडतोड केल्याबद्दल अविश्वास खटला दाखल केला आहे.

Phhhoto अ‍ॅपचा मेटाविरोधात खटला, खास फीचरची कॉपी केल्याचा आरोप
Meta
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 4:26 PM

मुंबई : एका फोटो अ‍ॅपने फेसबुकवर आरोप केला आहे की फेसबुकने त्यांचे फीचर्स इन्स्टाग्रामसाठी कॉपी केले आहेत. Instagram कंपीटीटरने मेटाविरोधात (पूर्वी फेसबुक म्हणून ओळखले जाणारे) त्यांच्या फीचरचे क्लोनिंग आणि कॉम्पिटिशनची मोडतोड केल्याबद्दल अविश्वास खटला दाखल केला आहे. फेसबुकविरुद्धचा हा पहिलाच अविश्वास खटला नाही. सोशल मीडिया कंपनीवर यापूर्वी अनेकदा स्पर्धा दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Facebook sued by defunct photo app Phhhoto for copying its main feature for Instagram)

Phhhoto अ‍ॅपने युजर्सना सिंगल पॉइंट-अँड-शूट बर्स्टमध्ये पाच फ्रेम्स कॅप्चर करण्याची, लहान GIF-सारखे व्हिडिओ तयार आणि शेअर करण्याची परवानगी दिली आहे. आपल्याला या फीचरबद्दल माहिती आहे कारण ते Instagram च्या अतिशय प्रसिद्ध बूमरॅंग फीचरसारखे आहे. हे आता सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या फीचर्सपैकी एक आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फीचर Facebook ने तयार केलेलं नाही. फेसबुकने इन्स्टाग्रामसाठी आपले फीचर कॉपी करून ते ‘बूमरँग’ म्हणून वापरकर्त्यांसमोर सादर केल्याचा आरोप Phhhoto ने केला आहे. द व्हर्जच्या वृत्तानुसार, कंपनीने आरोप केला आहे की, फेसबुकने इंस्टाग्रामच्या API वरून Phhhoto ब्लॉक केले आहे.

Phhoto ने तक्रारीत काय म्हटलंय?

“फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कृतींमुळे Phhoto ला एक व्हिएबल बिझनेस म्हणून नष्ट केले आणि कंपनीच्या गुंतवणुकीच्या शक्यता उद्ध्वस्त केल्या आहेत,” असे Phhoto ने गुरुवारी यूएस जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फेसबुकच्या या वृत्तीमुळे Phhoto अयशस्वी झालं. फेसबुकच्या वृत्तीने Phhoto ला सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी बनण्यापासून रोखले.

Phhhoto अ‍ॅप 2014 मध्ये लाँच

Phhhoto अ‍ॅप 2014 मध्ये लाँच करण्यात आले होते पण ते बाजारात फार काळ टिकले नाही. 2017 मध्ये हे अॅप बंद करण्यात आले होते. अॅपने दावा केला आहे की, सुरुवातीच्या दिवसांत त्यांचे मासिक सक्रिय युजर्स 3.7 मिलियन इतके होते. अॅपमध्ये बेयॉन्से, जो जोनास, क्रिसी टेगेन आणि बेला हदीद यांच्यासह अनेक दिग्गज वापरकर्ते होते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, इंस्टाग्रामचे माजी सीईओ केविन सिस्ट्रॉम यांनी हे अॅप डाउनलोड केले आणि त्याचे फीचर्स तपासले, असे अहवालात म्हटले आहे.

Phhoto आता Meta कडून नुकसान भरपाईची मागणी करत आहे. तथापि, मेटा प्रवक्त्याने द व्हर्जला सांगितले की, Phhoto ने दाखल केलेला खटला योग्यतेशिवाय आहे आणि कंपनी न्यायालयात स्वतःचा बचाव करेल.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Facebook sued by defunct photo app Phhhoto for copying its main feature for Instagram)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.