फेसबुकची मोठी घोषणा, फेस डिटेक्शन टेक्नोलॉजी कायमची बंद करणार, 1 अब्ज युजर्सना फायदा
जेव्हा तुम्ही Facebook वर दुसर्या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड करता, तेव्हा Facebook त्या फोटोतील व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करतं. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या (Face Detection Technology) मदतीने करत होतं.
नवी दिल्ली : फेसबुक यापुढे तुम्ही अपलोड केलेले फोटो दुसऱ्या व्यक्तींसोबत ऑटो टॅग करणार नाही. फेसबुकने याची अधिकृत घोषणा केली आहे. खरं तर, फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप सातत्याने होत आहे, त्यानंतर कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले आहे की, ते फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी बंद करणार आहेत आणि एक अब्जाहून अधिक लोकांच्या चेहऱ्याचे फेसप्रिंट त्यांच्या सर्व्हरमधून हटवणार आहेत. (Facebook to shut down face-recognition system, will delete all data)
जेव्हा तुम्ही Facebook वर दुसर्या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड करता, तेव्हा Facebook त्या फोटोतील व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करतं. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या (Face Detection Technology) मदतीने करत होतं. खरं तर, फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे फेस त्यांच्या सर्व्हरवर स्टोर करतं आणि याचा वापर करून, फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने, ते वापरकर्त्याच्या फोटोमध्ये उपस्थित लोकांचे फेस डिटेक्ट करुन त्यांना टॅग करतं. मात्र या तंत्रज्ञानावर गेल्या काही काळापासून गोपनीयतेच्या उल्लंघनाचे आरोप होत आहे. प्रायव्हसी उल्लंघनाच्या सुरू असलेल्या वादामुळे फेसबुकने येत्या आठवडाभरात ही टेक्नोलॉजी बंद करण्याची घोषणा केली आहे.
इतकेच नव्हे तर फेसबुकने आपल्या सर्व्हरवर असलेले शेकडो कोटी फेस डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते, कारण यासाठी फेसबुक त्यांच्या सर्व्हरवर लाखो फेसेस स्टोर करत असे आणि बरेच लोक हे फेसबुक वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याचे मानत होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने (Federal Trade Commission) 2019 मध्ये फेसबुकला 500 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. त्याचवेळी, फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमुळे, गेल्या वर्षी अमेरिकेतील इलिनोइस प्रांतात, फेसबुकने तक्रारकर्त्याला त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात ‘फेस ज्यॉमेट्री’सह लोकांच्या बायोमेट्रिक माहितीच्या वापरावर तोडगा काढण्यासाठी 650 मिलियन डॉलर्स दिले होते.
फेसबुकच्या या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि युजर्सची बायोमेट्रिक माहिती फेसबुककडे असणे हे होते. मात्र, गेल्या महिन्यात फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने फेसबुकचे अंतर्गत दस्तावेज लीक केले होते, त्यानंतर फेसबुकला मोठा विरोध झाला होता. कंपनी युजर्सच्या गोपनीयतेचा वापर करून त्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला जात आहे. ही चूक सुधारण्यासाठी कंपनीने त्यांचे व्यावसायिक नावही बदलले होते.
इतर बातम्या
Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?
(Facebook to shut down face-recognition system, will delete all data)