दोन कॅमरे, व्हिडीओ कॉलिंग फीचर्ससह Facebook चं स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत…
Facebook ने म्हटले आहे की, त्यांनी या स्मार्टवॉच लाँचिंगसाठी पूर्ण तयारी केली आहे आणि सध्या या स्मार्टवॉचच्या दुसर्या आणि तिसर्या जनरेशनवर काम सुरु आहे.
मुंबई : अॅपल स्मार्टवॉचनंतर आता फेसबुक (Facebook) कंपनीदेखील आपलं स्मार्टवॉच लाँच करू शकते. हे लॉन्च पुढील वर्षाच्या सुरूवातीस होऊ शकते. सोशल मीडिया दिग्गज कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी या स्मार्टवॉच लाँचिंगसाठी पूर्ण तयारी केली आहे आणि सध्या या स्मार्टवॉचच्या दुसर्या आणि तिसर्या जनरेशनवर काम सुरु आहे. फेसबुक स्मार्टवॉचमध्ये अनेक न्यू जनरेशन फीचर्स मिळतील. डिव्हाइस बॉडीमध्ये दोन कॅमेरे दिले जातील, तसेच यात डिटॅचेबल डिस्प्ले मिळेल. (facebook will launch own smartwatch, know price and features)
फेसबुक स्मार्टवॉचच्या मदतीने युजर्स डिव्हाइसद्वारे मेसेज पाठवू शकतील. स्मार्टवॉचमध्ये आपल्याला हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित अनेक फीचर्स आढळतील. फेसबुक स्मार्टवॉच थेट Apple स्मार्टवॉचशीच नव्हे तर सॅमसंग, वनप्लस, ओप्पो, शाओमी, व्हिवो आणि इतर कंपन्यांनानादेखील तगडी स्पर्धा देईल.
फीचर्स आणि लाँचिंग डेट
पुढील वर्षी फेसबुक स्मार्टवॉच लॉन्च केले जाऊ शकते. आगामी स्मार्टवॉच भारतासह इतर सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्मार्टवाचच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात येईल जो आपण बाहेर काढू (डिटॅचेबल) शकता. तसेच यात आपल्याला दोन कॅमेरे मिळतील. दोन्ही कॅमेरे वेगवेगळ्या प्रकारे काम करतील.
डिटॅचेबल पार्ट काढून तुम्ही फोटो आणि व्हिडीओ क्लिक करु शकता. आपल्याला माहित आहे की, फेसबुक कंपनी हे घड्याळ बनवत आहे. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर काहीही शेअर करू शकता. फेसबुक स्मार्टवॉचचा फ्रंट कॅमेरा व्हिडीओ कॉलिंगलाही सपोर्ट करेल. त्याच वेळी, फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी कंपनी मागील बाजूस HD कॅमेरा प्रदान करेल. यामध्ये कॉलिंग, फोन, मेसेजिंग, LDTE, हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित फिचर्स मिळतील.
किंमत
स्मार्टवॉच तीन रंगांमध्ये सादर करण्यात येणार आहे ज्यात व्हाइट, ब्लॅक आणि गोल्ड रंगांचा समावेश आहे. कंपनी ब्लू व्हर्जनदेखील लाँच करू शकते. स्मार्टवॉचची किंमत 400 डॉलर इतकी असू शकते. त्याचबरोबर भारतात त्याची किंमत 30,000 रुपये इतकी असू शकते.
इतर बातम्या
Reliance AGM मध्ये 5G सर्व्हिसची घोषणा, जाणून घ्या किती असेल इंटरनेट स्पीड?
इन्स्टाग्रामवर शॉपिंग आणखी सोपे होणार; फेसबुकचे व्हिज्युअल सर्चवर काम सुरू
(facebook will launch own smartwatch, know price and features)