जोडीदार शोधताय? नवा डेटिंग अ‍ॅप, चॅट ऐवजी थेट व्हिडीओ कॉल करा, मनातलं सगळं मळभ बाहेर काढा

आपल्या मनातलं सर्व मळभ बाहेर काढण्यासाठी, मनमोकळं होण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्येकाला एका जोडीदाराची आवश्यकता असते (Facebook will launched new dating app name as sparked)

जोडीदार शोधताय? नवा डेटिंग अ‍ॅप, चॅट ऐवजी थेट व्हिडीओ कॉल करा, मनातलं सगळं मळभ बाहेर काढा
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 3:53 PM

मुंबई : आपल्या मनातलं सर्व मळभ बाहेर काढण्यासाठी, मनमोकळं होण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्येकाला एका जोडीदाराची आवश्यकता असते. जोडीदारामुळे अनेकजण परिपूर्ण होतात. अनेकजण जोडीदाराच्या मदतीने आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतात. तसेच जोडीदाराजवळ मनातील कोणतीही खदखद, मानसिक त्रास सांगितलं तर हलंक होतं. कोणत्याही समस्यांवर मार्ग काढता येतो. त्यामुळे अनेक सिंगल व्यक्ती जोडीदाराच्या शोधात असतात. यात काहीच गैर नाही. तसं वाटणं हे साहजिकच आहे. तुम्हीदेखील सिंगल आहात आणि जोडीदाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. कारण फेसबुक लवकरच एक नवं कोरं डेटिंग अ‍ॅप आणत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जोडीदार शोधू शकणार आहात. किंवा एखाद्या व्यक्तीसोबत डेटला जाऊ शकणार आहात (Facebook will launched new dating app name as sparked).

फेसबुक नेमकं कोणतं अ‍ॅप आणतंय?

फेसबुक सध्या नव्या स्पीड डेटिंग अ‍ॅपची टेस्ट करत आहे. या अ‍ॅपचं नाव Sperked असं आहे. या अ‍ॅपला फेसबुकची इन हाऊस टीम म्हणजेच NPE ने बनवलं आहे. मात्र हे अ‍ॅप फेसबुक डेटिंग पेक्षाही वेगळं आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला फेसबुक प्रोफाईलद्वारे अकाउंट बनवावं लागतं. सध्या या अ‍ॅपची टेस्टिंग सुरु आहे. फेसबुक टीम या अ‍ॅपची टेस्टिंग करत आहे. ‘द वर्ज’ने या डेटिंग अ‍ॅपबद्दल खुलासा केला आहे (Facebook will launched new dating app name as sparked).

द वर्जच्या रिपोर्टमध्ये या अ‍ॅपच्या वेबपेजविषयी माहिती देण्यात आली आहे. चांगल्या लोकांसोबत व्हिडीओ डेटिंग, असं या अ‍ॅपबाबत लिहिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. हे डेटिंग अ‍ॅप बंबल, टिंडर, हिंज आणि इतर अ‍ॅपच्या मानाने भरपूर वेगळं आहे. या नव्या अ‍ॅपमध्ये तुम्हाला स्वाईप राईट किंवा लेफ्टचं ऑप्शन मिळणार नाही. दुसरीकडे या अ‍ॅपसाठी फेसबुक तुमच्याकडून पैसे घेणार नाही. अगदी मोफत असं हे अ‍ॅप आहे.

अ‍ॅपमध्ये विशेष काय?

अ‍ॅपच्या फिचर्सबाबत बोलायचं झालं तर तुमची मतं किंवा मन एखाद्या व्यक्तीसोबत जुळत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत चॅट करु शकणार नाहीत, तर थेट व्हिडीओ कॉल करुन व्हिडीओ डेटला जाल. हा व्हिडीओ चार मिनिटांचा असेल. याचा अर्थ तुमचा पहिला डेट हा फक्त चार मिनिटांचा असेल. पण या चार मिनिटात तुमचे इतर व्यक्तीसोबत मन जुळले तर दुसऱ्यावेळी तुम्ही दहा मिनिटांचा व्हिडीओ कॉल करु शकणार आहात.

फक्त चांगल्या लोकांनाच अ‍ॅपमध्ये जागा

तुम्ही या अ‍ॅपमध्ये व्हिडीओ डेट करताना आपला स्वत:चा मोबाईल नंबर, पत्ता देखील शेअर करु शकणार आहात. मात्र, हे सर्व जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. कारण ज्यांची प्रोफाईल चांगली नाही किंवा संशियत वाटणारी असेल अशा लोकांना या डेटिंग अ‍ॅपवर अजिबात जागा नाही. जेव्हा तुम्ही प्रोफाईल बनवाल तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातील. त्या आधारावरच तुम्हाला या डेटिंग अ‍ॅपमध्ये जागा मिळेल.

प्रोफाईल बनवता कोणते प्रश्न विचारले जातील?

पहिल्या स्टेपला तुम्हाला तुमच्यातील चांगल्या गोष्टी विचारल्या जातील. तुम्ही किती चांगले डेटर आहात याची माहिती विचारली जाईल. त्यानंतर एक व्यक्ती तुमचा रिव्ह्यू घेईल त्यानंतरच तुम्हाला डेटिंग अ‍ॅपवर जुळता येईल. दरम्यान, एक महत्त्वाचा विषय आहे. स्वाईप लेफ्ट किंवा राईटचा ऑप्शन नसताना युजर एकमेकांना कसे मॅच करु शकतात? हा प्रश्न सध्या तरी निरुत्तरीत आहे. याशिवाय फेसबुकने या अ‍ॅपच्या प्रायव्हसीबाबत काहीच सांगितलेलं नाही. कदाचित हे अ‍ॅप लॉन्च झाल्यानंतर याबाबतची सविस्तर माहिती दिली जाईल.

हेही वाचा : आपल्या घड्याळामध्ये AM आणि PM का लिहिले जाते? जाणून घ्या याचा अर्थ

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.