AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकचा मोठा निर्णय, रिल्स बनविणाऱ्यांची होणार चांदी

फेसबुकने आपल्या युजर्स करीता नविन फिचर आणली आहेत. यामुळे रिल्स बनविण्याची आवड असणाऱ्यांचा फायदा होणार आहे.

फेसबुकचा मोठा निर्णय, रिल्स बनविणाऱ्यांची होणार चांदी
Facebook-ReelsImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 7:20 PM

मुंबई : जगभर प्रसिद्ध असलेली सोशल मिडीया ( social media ) साईट फेसबुकने ( facebook ) आता नवे बदले केले आहेत. मेटाने फेसबुकवर सक्रीय असणाऱ्या क्रिएटर्स लोकांसाठी काही नविन बदल केले आहेत. फेसबुकने ‘क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन’ फिचर लॉंच केले आहेत. त्यामुळे हे नविन फिचर्स आल्यानंतर फेसबुकवर व्हिडीओ रिल्स  ( Video Reels ) बनविणाऱ्यांची चांगलीच चांदी होणार आहे. फेसबुकने रिल्सची टाईम लिमिट वाढविली आहे. त्यामुळे आता रिल्स क्रिएटीर्स आता 90 सेंकदाचा व्हिडीयो बनवू शकणार आहेत.

फेसबुकवर रिल्स बनविणे आणि त्यावर लाईक्स आणि व्यूज मिळविणे यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात, त्यात सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटी लोकांचाही समावेश असतो. अनेक जण आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण किंवा आपल्यातीस कलागुण दाखविण्यासाठी रिल्सचा खूपच वापर करीत असतात, आता अशा लोकांनी फेसबुकने मोठी गुड न्यूज आणली आहे. या पूर्वी फेसबुक वापरणाऱ्यांना रिल्स बनविताना युजर्सना केवळ साठ सेंकदाचा अवधी मिळत असायचा. आता कंपनीने या रिल्सचा कालवधी वाढविण्याची घोषणा मेटा फॉर क्रिएटर्स अकाऊंटवरून केली आहे. आता रिल्सचा टाईम लिमिट 90 सेंकदाचा केला आहे.

रिल्सचा टाईम लिमिट वाढविण्याबरोबरच क्रिएटर्सना आणखी एक मोठे फिचर मिळणार आहे. आता क्रिएटर आपल्या फोनच्या मेमरीतून खूप सहजतेने रेडीमेड रिल्स सुद्धा तयार करू शकणार आहेत. म्हणजेच तुमच्या फोनच्या गॅलरीत जर कुठला व्हिडीओ सेव्ह असेल तर तो देखील अपलोड करता येणार आहे. फेसबुकमध्ये हे दोन फिचर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सारखेच असून त्यांचा उपयोग खूप केला जात असतो.

नविन ग्रुव्स फिचर

फेसबुक कंपनीने आता नविन ग्रुव्स फिचर सुद्धा आणले आहे. त्यात आता युजरच्या व्हिडीओतील मोशन गाण्याच्या तालावर आपोआपच सिंक केल्या जाणार आहेत. नविन टेम्पलेट्स टूलमुळे युजर आता सहजपणे ट्रेंडींग टेम्प्लेट सह रिल्स बनवू शकणार आहेत. गेल्या महिन्यातच मेटाने घोषणा केली होती की, रिल्स क्रिएटर्सना जाहीराती देण्यासाठी मशिन लर्निंग मॉडेलचा वापर करण्याच्या पद्धतीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी फेसबुकच्या वाय एम आय सीईंग धीस एड ? ला अपडेट करणार आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.