लाँचिंगपूर्वीच FAU-G चा रेकॉर्ड, 10 लाखांहून अधिक युजर्सकडून गेमसाठी रजिस्ट्रेशन
बहुप्रतिक्षित FAU-G हा मोबाईल गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आला आहे.
मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. PUBG Mobile या गेमवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने FAUG (Fearless and United Guards) नावाच्या गेमचा टीझर शेअर केला होता. हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. 30 नोव्हेंबरपासून कंपनीकडून हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आला आहे. मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10.6 लाख युजर्सनी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे. ही संख्या अजून वाढत आहे. (FAU-G recorded over one million pre registration in first 24 hours)
हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.
अॅपल युजर्सना प्रतीक्षा
FAU-G हा मोबाइल गेम अद्याप लाँच झालेला नाही, हा गेम Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉयड युजर्ससाठीच येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु हा गेम अॅपल युजर्ससाठीदेखील लाँच केला जाईल अशीही चर्चा सुरु आहे. परंतु अॅपल युजर्सना या गेमसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कंपनीने हा गेम अद्याप अॅपलच्या App Store वर प्री-रजिस्ट्रेशन उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे हा गेम आधी अँड्रॉयड युजर्सच्या हाती पडणार आहे.
कसा आहे गेम प्ले?
गुगल प्ले स्टोअरवर कंपनीने गेमसोबत काही फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये सैनिक लढताना दिसत आहेत. डोंगराळ प्रदेशात लढाई सुरु असल्याचे दिसत आहे. या गेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, FauG कमांडो अत्यंत धोकादायक सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि ते भारताच्या शत्रूंबरोबर युद्ध करतील. गेम-प्ले भारतीय सैन्याशी संबंधित आहे, असं प्ले स्टोरवरील फोटोंवरुन वाटतंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.
या गेमबाबत माहिती देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले होते. त्यामध्ये अक्षयने म्हटले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेयर्स मनोरंजनाव्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारताच्या ‘वीर ट्रस्ट’साठी दान केलं जाईल.” अक्षय कुमारने 4 सप्टेंबर रोजी या गेमची घोषणा केली होती.
Supporting PM @narendramodi’s AtmaNirbhar movement, proud to present an action game,Fearless And United-Guards FAU-G. Besides entertainment, players will also learn about the sacrifices of our soldiers. 20% of the net revenue generated will be donated to @BharatKeVeer Trust #FAUG pic.twitter.com/Q1HLFB5hPt
— Akshay Kumar (@akshaykumar) September 4, 2020
संबंधित बातम्या
पबजी फॅन्ससाठी खूशखबर! पुढील आठवड्यात PUBG Mobile India लाँच होण्याची शक्यता
PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण
(FAU-G recorded over one million pre registration in first 24 hours)