इन्व्हर्टर आणि स्मार्ट ACमध्ये काय असतो फरक ? कोणता विकत घेणं ठरतं जास्त फायदेशीर ?

तुम्ही इन्व्हर्टर एसी किंवा स्मार्ट एसी यापैकी कोणता विकत घ्यावा, हे संपूर्णपणे तुमच्या प्रायॉरिटीवर अवलंबून आहे.

इन्व्हर्टर आणि स्मार्ट ACमध्ये काय असतो फरक ? कोणता विकत घेणं ठरतं जास्त फायदेशीर ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 2:15 PM

नवी दिल्ली : सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला असून वाढत्या उन्हामुळे गरमी (hot summer) खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत फॅन, कूलर, एसी यांचा वापरही वाढतोय. जेव्हा एखादा चांगला एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार येतो, तेव्हा इन्व्हर्टर एसी (Inverter AC) आणि स्मार्ट एसी (Smart AC) ही नावे सर्वात वर येतात. अलिकडच्या वर्षांत हे दोन एसी खूप लोकप्रिय झाले आहे. हे दोन्ही एसी त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेने सुसज्ज आहेत. तुम्हीही इन्व्हर्टर एसी किंवा स्मार्ट एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण निर्णय घेऊ शकत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या लेखात, दोघांमधील फरक आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया.

इन्व्हर्टर एसी (Inverter AC)

इन्व्हर्टर एसी हा एक प्रकारचा एअर कंडिशनर आहे जो खोलीच्या तापमानानुसार त्याची कूलिंग कॅपॅसिटी ॲडजस्ट करण्यासाठी कंप्रेसरचा वापर करतो. म्हणजे एसी पारंपरिक एसीप्रमाणे चालू आणि बंद करण्याऐवजी एकसमान तापमान राखण्यासाठी वेगवेगळ्या स्पीडने चालू राहून तापमान कायम राखतो.

हे सुद्धा वाचा

इन्व्हर्टर एसीचे फायदे

इन्व्हर्टर एसीचा एक मुख्य फायदा म्हणजे तो तुम्हाला विजेची बचत करण्यास आणि तुमचे वीज बिल कमी करण्यास मदत करू शकतो. किंबहुना, एकसमान तापमान राखण्यासाठी त्याला तितके कष्ट करावे लागत नाहीत, त्यामुळे तो एकूणच कमी उर्जा वापरते. शिवाय, इन्व्हर्टर एसी पारंपारिक एसीपेक्षा शांत आणि अधिक कार्यक्षम असतात.

स्मार्ट एसी (Smart AC)

दुसरीकडे, स्मार्ट एअर कंडिशनर हा स्मार्टफोन ॲप किंवा व्हॉइस असिस्टंटद्वारे दुरूनही नियंत्रित करता येऊ शकतो. इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने तापमान ॲडजस्ट करण्यास, शेड्यूल सेट करण्यास आणि एनर्जीच्या वापरावर लक्ष ठेवण्याची स्मार्ट एसी हा युजरला परवानगी देतो.

स्मार्ट एसीचे फायदे

स्मार्ट एसीचा एक मुख्य फायदा म्हणजे तो तुम्हाला एअर कंडिशनिंगवर अधिक नियंत्रण देतो. तुम्ही तुमच्या सीटवरून न उठता किंवा युनिटकडे न जाता तापमान सहज ॲडजस्ट करू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या फोनवरून एसी चालू किंवा बंदही करू शकता. याव्यतिरिक्त, काही स्मार्ट एसी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण (air quality monitoring) आणि ऑटोमॅटिक शेड्युलिंग यासारख्या वैशिष्ट्यांसह येतात, जे तुम्हाला विजेची बचत करण्यात आणि घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात.

कोणता एसी विकत घ्यावा ?

तुम्ही इन्व्हर्टर एसी किंवा स्मार्ट एसी यापैकी कोणता विकत घ्यावा, हे संपूर्णपणे तुमच्या प्रायॉरिटीवर अवलंबून आहे. तुम्हाला वीज बिलात पैसे वाचवायचे असतील तर तुमच्यासाठी इन्व्हर्टर एसी योग्य आहे. याशिवाय, जर तुम्हाला तुमचा एसी फीचर्ससह त्यावर कंट्रोल हवा असेल तर तुमच्यासाठी स्मार्ट एसी हा एक चांगला पर्याय आहे. अनेक एसी इनव्हर्टर एसी आणि स्मार्ट एसी या दोन्ही गुणवत्तेसह येतात. अशा प्रकारे, आपण वीज वाचवू शकता आणि एअर कंडिशनिंग कंट्रोलही करू शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.