30 स्पोर्ट्स मोड, इनबिल्ट गेम्ससह Fire Boltt Ninja Calling Smartwatch बाजारात, आजपासून सेल Live

फायर बोल्ट निंजा कॉलिंग स्मार्टवॉच (Fire Boltt Ninja Calling Smartwatch) काही आठवड्यांपूर्वी अमेझॉनवर लिस्ट केल्यानंतर आता भारतात लाँच करण्यात आले आहे. कंपनीने आता या स्मार्टवॉचची किंमत आणि उपलब्धतेबाबत घोषणा केली आहे.

30 स्पोर्ट्स मोड, इनबिल्ट गेम्ससह Fire Boltt Ninja Calling Smartwatch बाजारात, आजपासून सेल Live
Fire Boltt Ninja Calling Smartwatch
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 8:00 AM

मुंबई : फायर बोल्ट निंजा कॉलिंग स्मार्टवॉच (Fire Boltt Ninja Calling Smartwatch) काही आठवड्यांपूर्वी अमेझॉनवर लिस्ट केल्यानंतर आता भारतात लाँच करण्यात आले आहे. कंपनीने आता या स्मार्टवॉचची किंमत आणि उपलब्धतेबाबत घोषणा केली आहे. निंजा सिरीजअंतर्गत (Ninja Smartwatch) फायर बोल्टने हे स्मार्टवॉच सादर केलं आहे. हे वॉच किफायतशीर सेगमेंटमध्ये येतं. कंपनीने या वॉचची किंमत 2,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. या स्मार्टवॉचची पहिली विक्री 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता अमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स साईटवर सुरू होईल. या स्मार्टवॉचमध्ये 30 विविध स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत, तसेच यात हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सदेखील मिळतील. फायर बोल्ट कंपनीने याआधीदेखील किफायतशीर किंमतीत स्मार्टवॉच सादर केले आहेत. त्यात आता Ninja Calling Smartwatch ची भर पडली आहे.

Fire-Boltt Ninja स्मार्टवॉचमधील फीचर्स

  1. Fire-Boltt Ninja ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केलं आहे आणि ते एक स्वस्त सेगमेंटमधलं स्मार्टवॉच आहे. यामध्ये, कंपनीने अनेक शानदार फीचर्स सादर केले आहेत, ज्यात अधिक बॅटरी बॅकअप आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखे फीचर्स आहेत.
  2. Fire-Boltt Ninja ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच स्क्वेरिश डिझाइनमध्ये येते आणि त्याची किंमत 2999 रुपये आहे. कंपनीने हे व्हाइट, ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड या चार कलर व्हेरियंटमध्ये सादर केले आहे.
  3. या स्मार्टवॉचची पहिली विक्री 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता Amazon वर सुरू होईल. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 240 x 280 पिक्सेल आहे. यात उजव्या बाजूला रोटेटेबल क्राउन आहे, जो वॉच नेव्हिगेट करण्यात मदत करतो.
  4. यात बिल्ट इन मायक्रोफोन आणि ब्लूटूथ कॉलिंगसाठी स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे कॉल रिसीव्ह केले जाऊ शकतात. याशिवाय कॉन्टॅक्ट्स, क्विक डायल पॅड आणि कॉल हिस्ट्री इत्यादी गोष्टी यामध्ये पाहता येतील. यात म्यूटचा पर्यायही आहे.
  5. या स्मार्टवॉचमध्ये 30 विविध स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत, ज्यामध्ये वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंग असे पर्याय देण्यात आले आहेत. यात SpO2 सेन्सर देखील मिळेल, जो ऑक्सिजन मॉनिटरिंगचे फीचर प्रदान करेल. विशेष म्हणजे यात इनबिल्ट गेम्सही आहेत.

इतर बातम्या

Smartphones Under 6000k: किंमत कमी, फीचर्स दमदार, पाहा टॉप 4 स्मार्टफोन्स

Apple M2 चिपसह नवीन MacBook लाँच करणार! जाणून घ्या काय असेल खास

WhatsApp चं नवीन फीचर, डॉक्यूमेंट्स पाठवताना महत्त्वाचे दस्तऐवज सेफ राहणार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.