Marathi News Technology Flipkart Big Billion Days sale 2021 : Bumper discount on Poco, Moto, Pixel smartphones, know full offer
Flipkart Big Billion Days : Poco, Moto, Pixel फोनवर बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच सुरू होणार आहे. फ्लिपकार्टने अद्याप त्याच्या तारखा जाहीर केल्या नाहीत, मात्र लवकरच कंपनी या सेलच्या तारखा जाहीर करून स्मार्टफोन डील्सबद्दल खुलासा करू शकते.
1 / 6
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच सुरू होणार आहे. फ्लिपकार्टने अद्याप त्याच्या तारखा जाहीर केल्या नाहीत, मात्र लवकरच कंपनी या सेलच्या तारखा जाहीर करून स्मार्टफोन डील्सबद्दल खुलासा करू शकते. फ्लिपकार्टच्या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. सूचीमध्ये तुम्हाला Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3 आणि Infinix Hot 10s वर सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देखील मिळवू शकता.
2 / 6
Poco X3 Pro : Poco ने X3 Pro हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केला होता, परंतु फ्लिपकार्टने खुलासा केला आहे की, हा फोन 16,999 रुपयांना विकला जाईल. ही किंमत लॉन्च किमतीपेक्षा 2,000 रुपयांनी कमी आहे.
3 / 6
मोटो एज फ्यूजन 20 - फ्लिपकार्टच्या टीझर पेजवरून समोर आले आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान मोटो एज फ्यूजन 20 हा फोन 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. मोटो एज फ्यूजन 20 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च प्राईस 21,499 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान 1,500 रुपयांची सवलत देण्यात आली आहे, यात तुम्हाला बँक डिस्काऊंट देखील मिळेल.
4 / 6
Asus ROG Phone 3 : या सेलमध्ये, तुम्ही Asus ROG Phone 3 हा स्मार्टफोन 34,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. ROG फोन 3 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 49,999 रुपये होती, पण भारतात ROG फोन 5 लाँच झाल्यानंतर कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे. यात तुम्हाला बँक डिस्काऊंट देखील मिळेल.
5 / 6
Infinix Hot 10S - फ्लिपकार्ट 12,999 रुपये या किंमतीच्या तुलनेत Infinix Hot 10s 9,499 रुपयांना विकणार आहे. हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता.
6 / 6
पिक्सेल 4 ए - काही डिस्काऊंट्स अद्याप जाहीर करणे बाकी आहे. तथापि, फ्लिपकार्ट सेल दरम्यान Pixel 4a ची किंमत 20,000 ते 29,999 रुपयांच्या दरम्यान असेल, जी सध्याच्या 31,999 रुपयांच्या किंमतीपेक्षा कमी आहे. पिक्सेल 4 ए आधी 29,999 रुपयांना उपलब्ध होता, त्यामुळे यावेळी किंमत त्यापेक्षा किंचित कमी असू शकते.