Flipkart Sale : Asus, Poco, Moto च्या स्मार्टफोन्सवर तब्बल 15000 रुपयांचा डिस्काऊंट

ऑनलाईन शॉपिंग करणारे ग्राहक फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची वाट पाहात असतात. कंपनीने नुकतीच या सेलची घोषणा केली आहे. 7 ऑक्टोबरपासून हा सेल फ्लिपकार्ट अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह होणार आहे.

Flipkart Sale : Asus, Poco, Moto च्या स्मार्टफोन्सवर तब्बल 15000 रुपयांचा डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 12:08 AM

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग करणारे ग्राहक फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची वाट पाहात असतात. कंपनीने नुकतीच या सेलची घोषणा केली आहे. 7 ऑक्टोबरपासून हा सेल फ्लिपकार्ट अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह होणार आहे. दरम्यान, फ्लिपकार्टच्या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. (Flipkart Big Billion Days sale : discount upto Rs 15000 on smartphones of Asus, Poco, Moto)

सूचीमध्ये तुम्हाला Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3 आणि Infinix Hot 10s वर सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देखील मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या स्मार्टफोनवर किती रुपयांची सूट मिळतेय.

Poco X3 Pro

Poco ने X3 Pro हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केला होता, परंतु फ्लिपकार्टने खुलासा केला आहे की, हा फोन 16,999 रुपयांना विकला जाईल. ही किंमत लॉन्च किमतीपेक्षा 2,000 रुपयांनी कमी आहे.

मोटो एज फ्यूजन 20

फ्लिपकार्टच्या टीझर पेजवरून समोर आले आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान मोटो एज फ्यूजन 20 हा फोन 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. मोटो एज फ्यूजन 20 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च प्राईस 21,499 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान 1,500 रुपयांची सवलत देण्यात आली आहे, यात तुम्हाला बँक डिस्काऊंट देखील मिळेल.

Asus ROG Phone 3

या सेलमध्ये, तुम्ही Asus ROG Phone 3 हा स्मार्टफोन 34,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. ROG फोन 3 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 49,999 रुपये होती, पण भारतात ROG फोन 5 लाँच झाल्यानंतर कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे. यात तुम्हाला बँक डिस्काऊंट देखील मिळेल.

Infinix Hot 10S

फ्लिपकार्ट 12,999 रुपये या किंमतीच्या तुलनेत Infinix Hot 10s 9,499 रुपयांना विकणार आहे. हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता.

Pixel 4 A

काही डिस्काऊंट्स अद्याप जाहीर करणे बाकी आहे. तथापि, फ्लिपकार्ट सेल दरम्यान Pixel 4a ची किंमत 20,000 ते 29,999 रुपयांच्या दरम्यान असेल, जी सध्याच्या 31,999 रुपयांच्या किंमतीपेक्षा कमी आहे. पिक्सेल 4 ए आधी 29,999 रुपयांना उपलब्ध होता, त्यामुळे यावेळी किंमत त्यापेक्षा किंचित कमी असू शकते.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Flipkart Big Billion Days sale : discount upto Rs 15000 on smartphones of Asus, Poco, Moto)

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.