Flipkart Electronics Sale 2020 : ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय 20,000 रुपयांची सूट

फ्लिपकार्टने नुकताच इलेक्ट्रॉनिक सेल सादर केला आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूवर बंपर डिस्काऊंट दिला जाणार आहे.

Flipkart Electronics Sale 2020 : 'या' स्मार्टफोनवर मिळतेय 20,000 रुपयांची सूट
इतकंच नाही तर तुम्ही इंधनाचा खर्चही त्यांना करायला सांगून तसं पॅकेज द्या. अशा प्रकारे तुम्ही दुचाकी, इंधन खर्च आणि देखभाल या खर्चापासून वाचाल.
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 4:35 PM

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या शॉपिंग फेस्टिव्हल्सदरम्यान स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स देऊन मोबाईल्सची रेकॉर्डब्रेक विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने आता पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक सेल (Flipkart Electronics Sale 2020) सादर केला आहे. हा सेल उद्यापासून सुरु होत असून 28 डिसेंबरपर्यंत सुरु राहील. (Flipkart Electronics Sale to start from December 26: best Offers on iPhone models)

या सेलमध्ये तुम्हाला फ्लिपकार्टवरील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूवर बंपर डिस्काऊंट दिला जाणार आहे. या डिस्काऊंट ऑफर्ससह आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे. तसेच कंपनीने जबरदस्त एक्सचेंज ऑफर्सही सादर केल्या आहेत.

फ्लिपकार्टने सर्वात मोठ्या ऑफर्स आयफोनच्या विविध मॉ़डेल्सवर ऑफर्स सादर केल्या आहेत. ग्राहक आयफोन एसई (Iphone SE) अवघ्या 32,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करु शकतात. या फोनमध्ये तुम्हाला ए13 चा पॉवरफुल चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच जबरदस्त कॅमेरा आणि शानदार डिझाईन देण्यात आलं आहे.

फ्लिपकार्टने आयफोन एक्स आर (Iphone XR) या मॉडेलवर 10 हजार रुपयांची सूट देऊ केली आहे. या फोनची मूळ किंमत 47 हजर 900 रुपये आहे. एक्सचेंज ऑफरवर हा फोन 34 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

आयफोन 11 प्रो (Iphone 11 Pro) 79,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करता येईल. या फोनची जुनी किंमत तब्बल 99,999 रुपये इतकी होती. या फोनवर तब्बल 20 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ऑफर देण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या यादीतला पुढचा फोन आहे रियलमी X3 सुपरझुम (realme x3 superzoom). हा स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 27,999 रुपये आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

नुकताच लाँच केलेला मोटो G 5G हा स्मार्टफोनही फ्लिपकार्टने डिस्काऊंट ऑफरसह विक्रीस उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तसेच HDFC आणि ICICI बँक कार्ड होल्डर्ससाठी या फोनवर डिस्काऊंट देण्यात आला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही आहे.

हेही वाचा

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

विक्रीच्या बाबतीत iPhone 12 कडून जुने रेकॉर्ड मोडीत, ठरला बेस्ट सेलिंग 5G स्मार्टफोन

(Flipkart Electronics Sale to start from December 26: best Offers on iPhone models)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.