फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. हा मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह झाला आहे, जो 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रियलमी (Realme), रेडमी (Redmi) आणि मोटोरोला (Motorola), शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo) कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या कंपन्यांचे अनेक फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना फ्लिपकार्टने दिली आहे. तसेच या सेलमध्ये तसेच आयफोन 11, आयफोन XR आणि आयफोन SE वर देखील डिस्काऊंट देण्यात आला आहे.