मुंबई : फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान टीसीएल हा आघाडीचा इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड प्रिमिअम मिनी एलईडी, 4के, क्यूएलईडी टीव्ही अशा प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. या आकर्षक ऑफर्ससह आकर्षक बँक ऑफर्स फ्लिपकार्टवर 17 जानेवारी 2022 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत वैध असतील. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन आला आहे. यात टेलिव्हिजनच्या आधुनिक व प्रिमिअम सिरीजच्या परिपूर्ण श्रेणीसोबत स्मार्ट टीव्हींचे नियमित मॉडेल्स देखील सेल कालावधीदरम्यान सर्वोत्तम दरामध्ये उपलब्ध असतील.
एचडी रेडी एस 5200 (HD Ready S5200) : टीसीएल एस 5200 सिरीजमध्ये स्लिम डिझाइनसह अत्यंत रूंद बेझल्स, एचडीआर पिक्चर क्वॉलिटी, मायक्रो डिमिंग, डॉल्बी ऑडिओ, वॉईस सर्च फंक्शन अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. स्मार्ट टीव्ही तुम्हाला हाय क्वॉलिटीमध्ये लाइव्ह स्पोर्टस् व इतर कन्टेन्ट पाहण्याचा आनंद देतो. बिल्ट-इन गुगल असिस्टण्ट युजर्सना सुलभ वॉईस कमांड्ससह टीव्ही ऑफरेट करण्याची, तसेच युजर-अनुकूल अनुभव देखील देते. ए+ ग्रेड फुल एचडी पॅनेल सुलभ, सुस्पष्ट व शार्प व्हिज्युअल्सची खात्री देते. 32-इंच व 43-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे 15,499 रूपये व 24,999 रूपये आहे.
पी 30 एफएस (P30 FS) : ए+ ग्रेड पॅनेलसह एचडीआर 10 व मायक्रो डिमिंग प्रेक्षकांना सर्वोत्तम टीव्ही पाहण्याचा अनुभव देतात. यासह या टीव्हीमध्ये बिल्ट-इन स्टिरिओ बॉक्स स्पीकर्स व डॉल्बी ऑडिओ आहे, जे साऊंड क्वॉलिटी सानुकूल करण्यामध्ये मदत करतात. वॉईस रिमोट मनोरंजनाचा अनुभव अधिक सुलभ करते, जेथे वॉईस कमांड्सच्या माध्यमातून टीव्हीवर नियंत्रण ठेवता येते. 43-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 24,999 रूपये आहे.
पी 305 एचडी रेडी (P305 HD Ready): आकर्षक व शक्तिशाली पी३०५ स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही सर्वोत्तम पिक्चर्स, सर्वोत्तम साऊंड क्वॉलिटी व मनोरंजन पर्यायांची व्यापक श्रेणी देतो. या होम एंटरटेन्मेंट डिवाईसमध्ये घरातील सजावटीला साजेशी अशी स्लिम डिझाइन, डायनॅमिक साऊंडसाठी स्टिरिओ सराऊंड्स साऊंड बॉक्स स्पीकर आणि स्मार्ट डिवाईसेसमधील कन्टेन्ट कास्ट करण्यासाठी बिल्ट-इन क्रोमकास्ट आहे. 32-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 14,999 रूपये आहे.
एस 65 ए एचडी रेडी एलईडी (S65 A HD Ready LED): टीसीएल एस65ए अँड्रॉईड टीव्हीमधील एचडीआर वैशिष्ट्य पिक्चर कॉन्ट्रास्ट, इमेज सुस्पष्टता सानुकूल करते आणि इमेजेसमध्ये रंगांची भर व्युईंग अनुभवामध्ये वाढ करते. स्पेशल अल्गोरिदमचा वापर आपोआपपणे या स्मार्ट टीव्हीच्या इल्युमिनेशनमध्ये बदल करत स्क्रिनवरील ब्राइटनेस वाढवते. यामुळे तुम्ही ब्राइटनेस व सूक्ष्म डिटेल्सच्या व्यापक श्रेणीसह ग्राफिक्स निर्माण करू शकता. 32-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 15,999 रूपये आहे.
एफएचडी एस 6500 एफएस (FHD S6500 FS): सर्वोत्तम व्युईंग अनुभव देणा-या या टीव्हीमध्ये अनेक कनेक्टीक्यूटी वैशिष्ट्ये देखील आहे. ज्यामुळे अधिकाधिक मनोरंजनाची खात्री मिळते. इंटरनेट ब्राऊजिंग असलेला हा टेलिव्हिजन मोठ्या स्क्रिनवर ऑनलाइन विश्वाचा अनुभव देतो आणि तुम्हाला प्रत्येकवेळी कनेक्टेड ठेवतो. या सर्व वैशिष्ट्यांसह स्लीक डिझाइन घराच्या सजावटीला शोभेल अशी आहे. 43-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 24,999 रूपये आहे.
एस 6500 एस (S6500 S) : पूर्णत: सर्वोत्तम व्युईंग अनुभव देण्यासोबत या टेलिव्हिजनमध्ये सर्वोत्तम मनोरंजन अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी अनेक कनेक्टीक्यूटी वैशिष्ट्ये आहेत. या टीव्हीमध्ये इंटरनेट कनेक्टीक्यूटी देखील आहे, ज्यामुळे तुम्ही ब्राऊज करू शकता आणि विनाव्यत्यय तुमचे आवडते कार्यक्रम पाहू शकता. 32-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 15,4999 रूपये आहे.
एचडी एलईडी डी 311 (HD LED D 311) : टीसीएल डी311 आवडत्या मालिका व चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना डोळयांना अद्वितीय व्युईंग अनुभव देतो. या टीव्हीमध्ये एचडीआर तंत्रज्ञान आणि आकर्षक व्हिज्युअल क्वॉलिटी व वैविध्यपूर्ण रंगसंगती आहे. एकीकृत करण्यात आलेले स्पीकर्स सर्वोत्तम ऑडिओ देत टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला नवीन उंचीवर घेऊन जातात. डी311 मध्ये वाइड व्युईंग अँगल देखील आहे, ज्यामुळे तुम्ही घराच्या कोणत्याही कोप-यामधून आवडत्या मालिका पाहण्याचा आनंद घेऊ शकता. 32-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 12,999 रूपये आहे.
इतर बातम्या
मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स
10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप