Facebook : फेसबुकवरील सर्च हिस्ट्री डिलीट करण्यासाठी ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा

गुगल क्रोम प्रमाणेच तुम्ही फेसबुक सर्च हिस्ट्री देखील डिलीट करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या लेखातून फेसबुकवरील सर्च हिस्ट्री डिलीट करण्याची सोपी पध्दत जाणून घेणार आहोत.

Facebook : फेसबुकवरील सर्च हिस्ट्री डिलीट करण्यासाठी ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा
फेसबुकImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 1:14 PM

मुंबई : फेसबुक (Facebook) हे सोशल मीडियाचे (Social media) एक प्रभावी माध्यम आहेत. अस कुणीही नसेल जे दिवसातून एकदा तरी फेसबुक ओपन करुन काय नोटीफिकेशन आलेय, हे बघत नसेल. भारतात कोट्यवधी लोक रोज फेसबुकवर सक्रिय असतात. अनेकांच्या आयुष्यात फेसबुक हे पहिलेच सोशल मीडिया अ‍ॅप असून या माध्यमातूनच त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश झाला असेल. फेसबुक हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तुम्ही तुमचे जुने मित्र शोधू शकता आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. किंवा तुम्ही नवीन मित्र देखील बनवू शकता. बरं, या सर्व गोष्टी जवळपास सगळ्यांनाच माहीत आहेत, पण तुम्ही तुमचा फेसबुक सर्च हिस्ट्री कसा डिलीट (Delete) कराल याचा कधी विचार केला आहे का? या लेखातून त्याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.

गुगल क्रोम प्रमाणे फेसबुकवरही तुम्ही कोणाला सर्च केले आहे, या प्रत्येक गोष्टीचा तपशील असतो. जर कोणी तुमचे फेसबुक अकाउंट तपासले तर त्यांना कळेल की तुम्ही त्यावर काय शोधले आहे. बरं ते हटवणं हे खूप सोपं काम आहे. तुम्ही जसे गुगल क्रोमची हिस्ट्री डिलीट करता, त्याचप्रमाणे तुम्ही या अ‍ॅपची हिस्ट्रीदेखील डिलीट करु शकता. काही क्लिक्समध्ये तुमचे काम पूर्ण होईल.

असा डिलीट करा डाटा

  1. यूजरला सर्वात आधी त्याच्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक अ‍ॅप ओपन करावे लागेल.
  2. यानंतर, तुम्हाला सर्च आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. सर्च उघडल्यानंतर, तुम्हाला एडीट बटणावर क्लिक करावे लागेल.
  5. आता तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी लॉग ओपन होईल. येथे तुम्हाला Clear Search या पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे आपण फक्त चार स्टेप्स्‌नुसार आपल्या फेसबुक अकाउंटवरील हिस्ट्री डिलीट करु शकतात.

दरम्यान, जर तुम्ही वेब ब्राउझरद्वारे फेसबुक वापरत असाल तर तुम्हाला फेसबुकच्या अधिकृत साइट Facebook.com वर जावे लागेल. यानंतर, युजर्सना वरच्या उजव्या कोपर्यात दिसणार्‍या ड्रॉप डाउन बाणावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या पर्यायावर जाऊन अ‍ॅक्टिव्हिटी लॉगवर क्लिक करावे लागेल. येथून, युजर्सना अ‍ॅक्टिव्हिटी लॉगमधील लॉग केलेल्या क्रिया आणि इतर क्रियाकलापांच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला सर्च हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. यानंतर, तुम्ही क्लिअर सर्च वर क्लिक करून सर्च हिस्ट्री डिलीट करू शकता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.