3 लाख गेमर्सवर BGMI खेळण्याची बंदी, Krafton ची कारवाई, कारण काय?

बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाने (BGMI) त्यांच्या गेमच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर अॅक्टिव्हिटी रोखण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 1,42,000 पेक्षा जास्त खेळाडूंवर बंदी घातली आहे.

3 लाख गेमर्सवर BGMI खेळण्याची बंदी, Krafton ची कारवाई, कारण काय?
Battlegrounds Mobile India
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 8:23 PM

BGMI Latest News : बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाने (BGMI) त्यांच्या गेमच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर अॅक्टिव्हिटी रोखण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 1,42,000 पेक्षा जास्त खेळाडूंवर बंदी घातली आहे. गेम डेव्हलपर क्राफ्टनने नवीन अपडेट BGMI च्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केले असून, त्यांनी प्रकरणांची चौकशी केली आहे आणि या महिन्यात 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान विविध अकाऊंट्सवर कायमची बंदी घातली आहे. डेव्हलपरने बंदी घातलेल्या अकाऊंट्सच्या नावांसह यादी देखील अपडेट केली आहे. यासह, कंपनी लवकरच PUBG मोबाईल, फ्री-टू-प्ले बॅटल रॉयल गेम वरून डेटा ट्रान्सफर करणे थांबवणार आहे. (Battlegrounds Mobile India Bans 3 lakhs Accounts for Cheating in month)

क्राफ्टनने बुधवारी, 15 डिसेंबर रोजी त्यांच्या वेबसाइटवर एका पोस्टद्वारे घोषणा केली की, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियावरील 1,42,766 अकाऊंट्सवर 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान बेकायदेशीर प्रोग्राम वापरल्याबद्दल बंदी घालण्यात आली आहे. या अकाऊंट्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे आणि काही काळानंतरही ते युजर्स पुन्हा हा गेम खेळू शकणार नाहीत. कंपनीने म्हटले आहे की, ते गेमर्ससाठी चांगले गेमिंग वातावरण तयार करण्यावर काम करत आहेत, ज्यासाठी कंपनी बेकायदेशीर प्रोग्रामचा वापर रोखण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहे.

गेल्या महिन्यात, BGMI ने 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत 1,57,000 हून अधिक अकाऊंट्सवर बंदी घातली होती. म्हणजेच जवळपास महिन्याभरात कंपनीने 3 लाख अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. अनधिकृत चॅनेलवरून गेम डाउनलोड करणे किंवा बेकायदेशीर हेल्पर प्रोग्राम इंस्टॉल करणे यासारखी कोणतीही बेकायदेशीर अॅक्टिव्हिटी आढळल्यास क्राफ्टन खेळाडूंना नोटीस पाठवते. कंपनी सहसा खेळाडूंना बंदी घालण्यापूर्वी वार्निंग देते जेणेकरून ते अकाऊंट पुन्हा दुरुस्त करू शकतील.

PUBG: New State मध्ये हॅक्स वापरणाऱ्या, चीटिंग करणाऱ्या युजर्सवर कारवाई

भारतात नुकत्याच लाँच झालेल्या PUBG न्यू स्टेट (PUBG New State) या गेमबाबत एक नवीन अपडेट आले आहे. गेम डेव्हलपर कंपनी क्राफ्टनने सांगितले आहे की, ते गेममध्ये नवीन बदल करणार आहेत, जे हॅकर्सपासून गेमचे संरक्षण करण्यासाठी आणि गेमच्या माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी अँटी-चीटिंग अपडेट्स जारी करेल.

नवीन अपडेट सध्या अँड्रॉइड युजर्ससाठी आणले आहे. येत्या काळात, ते लवकरच iOS साठी देखील रोलआऊट केले जाईल. गेल्या वर्षी PUBG मोबाईलवर भारतात बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर कंपनीने बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया हे PUBG चे भारतीय व्हर्जन भारतात लॉन्च केले होते. त्यानंतर अलीकडेच कंपनीने PUBG: New State हा गेमदेखील लाँच केला आहे. हा गेम पबजीचं नवं व्हर्जन असल्याचे मानले जात आहे.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Battlegrounds Mobile India Bans 3 lakhs Accounts for Cheating in month)

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.