PUBG Mobile मध्ये Tesla च्या गाड्या दिसणार, कंपनीकडून मोठ्या भागीदारीची घोषणा

PUBG Mobile गेम भारतात बॅन करण्यात आला आहे. परंतु भारतीय युजर्स या गेमचा नवा अवतार असलेल्या Battlegrounds Mobile India चा आनंद घेऊ शकतात.

PUBG Mobile मध्ये Tesla च्या गाड्या दिसणार, कंपनीकडून मोठ्या भागीदारीची घोषणा
Pubg Mobile
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:15 PM

मुंबई : PUBG Mobile गेम भारतात बॅन करण्यात आला आहे. परंतु भारतीय युजर्स या गेमचा नवा अवतार असलेल्या Battlegrounds Mobile India चा आनंद घेऊ शकतात. Kraftan ने हा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम नव्या अवतारात सादर केला आहे. PUBG Mobile च्या फीचरबाबत बोलायचे झाल्यास, हा गेम प्लेयर्ससाठी अधिक मजेदार ठरणार आहे. कारण हा गेम अधिक दमदार बनवण्यासाठी PUBG Mobile ची पॅरेंट कंपनी Krafton ने जगातील लोकप्रिय इलेक्ट्रिक कारमेकर कंपनी Tesla सोबत भागीदारी केली आहे. (PUBG Mobile partners with tesla users will get new feature and skin know everything about it)

एलन मस्कच्या या कंपनीसोबत भागीदारी झाली असल्याची घोषणा Krafton कंपनीने सोशल मीडियावर केली आहे. या घोषणेसह, PUBG Mobile ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही आमच्यासोबत भविष्यात पाऊल ठेवण्यास तयार आहात? अनेक जबरदस्त उत्पादनांचा या गेममध्ये समावेश करण्यासाठी आम्ही टेस्लासोबत (Tesla) भागीदारी करत आहोत. पुढील अपडेटसाठी संपर्कात राहा!

यासह, कंपनी PUBG Mobile मध्ये टेस्ला कारद्वारे प्रेरित नवीन स्किनदेखील देऊ शकते. तथापि, यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागेल. क्राफ्टनने निश्चितपणे ही भागीदारी जाहीर केली आहे, परंतु हे फीचर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये (Battlegrounds Mobile India) उपलब्ध होईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, भारतीय युजर्सदेखील या भागीदारीचा फायदा घेऊ शकतील.

पबजीचं भारतात कमबॅक

भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. दरम्यान, पबजी गेम भारतात परतला आहे. हा गेम नव्या नावासह भारतात दाखल झाला आहे. हा गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) या नावाने भारतात दाखल झाला असून ठराविक अँड्रॉयड युजर्ससाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

Battlegrounds Mobile India काही युजर्ससाठी उपलब्ध झाला असला तरी फार आनंदित होऊ नका कारण ही फक्त एक प्रारंभिक आवृत्ती (स्टार्टिंग व्हर्जन) आहे आणि बीटा आवृत्तीसाठी साइन अप केलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. ट्विटरवरील काही युजर्सने स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये हा गेम डाउनलोडिंगसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे. स्क्रीनशॉटवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया या गेमची साईज 720MB इतकी आहे.

सर्वांसाठी कधी लाँच होणार?

हा गेम सर्वांसाठी कधी उपलब्ध होणार, याबाबतची कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. परंतु गेमचा अर्ली अ‍ॅक्सेस लाईव्ह झाला आहे. Google Play Store च्या माध्यमातून हा गेम केवळ बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया हा काही किरकोळ बदलांसह सादर करण्यात आलेला PUBG गेमच आहे. हा गेम 18 जून रोजी लाँच होणे अपेक्षित होते. परंतु त्या दिवशी कंपनीने काही ठराविक युजर्ससाठी हा गेम लाँच केला. गेमची ही बीटा फेज अजून किती दिवस असणार आहे, याबाबत कंपनीकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. परिणामी युजर्सना आणखी थोडी वाट पाहावी लागू शकते.

चिनी सर्व्हरला डेटा पाठवणं थांबवलं

गेल्या आठवड्याच्या अखेरीस एका अहवालात समोर आले होते की, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) हा गेम भारतीय युजर्सचा डेटा चीनी सर्व्हरसोसबत शेअर करत आहे. त्यामुळे या गेमवर बंदीची मागणी केली जात आहे. दरम्यान, बंदीची मागणी सुरु झाल्यानंतर कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही डेटा शेअरिंगची समस्या दूर केली आहे. दरम्यान, IGN इंडियाच्या अहवालानुसार बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाने यासाठी एक छोटासं अपडेट पाठवलं आहे. या अपडेटनंतर आता शेयरिंग एरर दुरुस्त झालं आहे.

एखाद्या प्लेअरने अ‍ॅप उघडताच, डिव्हाइसवर अपडेट लागू केले जाते. अपडेट पूर्ण झाल्यावर, गेम पुन्हा सुरू करण्यास सांगितले जाते आणि युजर्सना त्यांच्या गेमिंग अकाऊंटमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली जाते. तत्पूर्वी युजरला पुन्हा एकदा लॉग इन करायला सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा युजर्सने पॅकेट स्निफर पुन्हा चालविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गेम चिनी सर्व्हरला पिंग करत नव्हता.

Battlegrounds Mobile India खेळण्यासाठी कसा हवा स्मार्टफोन? कोणते फीचर्स गरजेचे?

बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या अधिकृत Google Play Store डिटेलनुसार Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉयड 5.1.1 च्या पुढचं व्हर्जन असायला हवं. 5.1.1 च्या पुढच्या OS व्हर्जन्सवरच हा गेम चालेल. तसेच फोनमध्ये 2 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त रॅम असायला हवा.

पालकांच्या परवानगीशिवाय गेम खेळता येणार नाही

क्राफ्टनने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्यूमेंटमध्ये सांगितलं आहे की, जे गेमर्स 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना आपल्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजेच पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर न देता ही मुलं पबजी गेम खेळू शकणार नाहीत. ते या गेममध्ये साईन अपच करु शकणार नाहीत. पालकांच्या परवानगीनंतरच ही मुलं पबजी गेम साईन अप करु शकतील.

परंतु येथे कंपनीची सर्वात मोठी चिंता ही आहे की, गेमर्स जो फोन नंबर देतील तो फोन नंबर बरोबर असेल का? कारण कोणताही युजर कोणाचाही फोन नंबर देऊन कंपनीची फसवणूक करु शकतात. अशा परिस्थितीत, कंपनी त्याबद्दल काय विचार करतेय, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

लाँचिंगआधीच PUBG वर बंदीची मागणी, ‘या’ आमदाराचं थेट पंतप्रधानांना पत्र

भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड

100 कोटींहून जास्त युजर्सनी डाऊनलोड केलेला PubG अद्याप ‘या’ दोन गेम्सच्या मागे

(PUBG Mobile partners with tesla users will get new feature and skin know everything about it)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.